काश्मीरला जाणार का?, युट्यूबरनं विचारला प्रश्न; पाकिस्तानीनं असं उत्तर दिलं, तुम्हीही हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 19:34 IST2025-03-25T19:32:45+5:302025-03-25T19:34:44+5:30

पाकिस्तानी सरकारने जनतेच्या मनात भारताबाबत इतकं विष पेरलं ज्यामुळे तिथले जिहादी पुन्हा काश्मीर मुद्द्यावर बोलू लागलेत.

Will you go to Kashmir?, YouTuber asked the question; Pakistani answered We will killed Hindu | काश्मीरला जाणार का?, युट्यूबरनं विचारला प्रश्न; पाकिस्तानीनं असं उत्तर दिलं, तुम्हीही हसाल

काश्मीरला जाणार का?, युट्यूबरनं विचारला प्रश्न; पाकिस्तानीनं असं उत्तर दिलं, तुम्हीही हसाल

पाकिस्तानात दिवसेंदिवस वाढणाऱ्या दहशती हल्ल्यामुळे विदारक स्थिती झाली आहे. पाकिस्तानातील शहबाज शरीफ सरकार त्यांच्या देशातील बिकट परिस्थितीचा सामना करण्याऐवजी लोकांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भडकवण्याचं काम करत आहे. अलीकडेच बलूचिस्तान इथल्या ट्रेन हायजॅक आणि सैन्याच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावरून पाकिस्तानने भारतावर आरोप लावले. पाकिस्तानी सरकारने जनतेच्या मनात भारताबाबत इतकं विष पेरलं ज्यामुळे तिथले जिहादी पुन्हा काश्मीर मुद्द्यावर बोलू लागलेत.

पाकिस्तानी युट्यूबर शोएब चौधरीने त्याच्या युट्यूब चॅनेलवर तिथल्या काही लोकांना प्रश्न विचारले, तुम्हाला काश्मीरात जायला आवडेल का त्यावर जमावाने अनेक चिथावणीखोर विधाने केली. एकाने म्हटलं की, इंशाअल्लाह...जरूर जाईन, तिथं जाऊन हिंदू आणि शत्रूंना मारेन. हिंदूंना मारणे मोठे काम आहे. आम्ही इस्लाम धर्मात जन्माला आलोय. जिथं मुसलमानांचा विषय येईल तिथे जीव देऊ, शहीद होऊन जन्नतमध्ये जाऊ असं सांगितले.  त्यांच्या या विधानावरून भारतीयांना हसू आवरेना. 

दुसरीकडे पाकिस्तानातील महागाईवर लोकांना प्रश्न केला. त्यावरून आम्ही गरीब घरातच जन्माला आलोय त्यामुळे या परिस्थितीला करणार तरी काय, आम्ही रडू का, कुणाच्या रडण्यानं महागाई कमी होणारी नाही असं एकाने म्हटलं. तर घरात मुले भुकेले आहेत. याठिकाणी लोक ४-४ दिवसाला जलसाला जाऊन स्वत:ला अपमानित करून घेत आहोत. कुराणचा निर्णय चुकीचा ठरवू नका. अल्लाह ज्याला हवी त्याला इज्जत देईल अथवा जिल्लत देईल असं एका नागरिकाने म्हटलं. 

दरम्यान, स्वत:च्या देशात इतकी वाईट आणि दयनीय अवस्था असतानाही लोकांमधील मस्ती कमी नाही. एकाने असेच काही हास्यास्पद विधान केले. जर मला भारतात घुसण्याची संधी मिळाली तर मी भारताला पूर्ण उद्ध्वस्त करून परतेन. इस्लामविरोधात कुणी काही बोलले तर त्याला सोडणार नाही असं सांगत त्याने पाकिस्तान सरकारवरही नाराजी व्यक्त केली. 
 

Web Title: Will you go to Kashmir?, YouTuber asked the question; Pakistani answered We will killed Hindu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.