प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 14:05 IST2025-12-18T13:58:34+5:302025-12-18T14:05:09+5:30
कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला स्वतःला माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी आणि दुबईतील माजी एअरलाइन्स व्यावसायिकाची पत्नी असल्याचा दावा करत आहे.

प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला स्वत:ला प्रसिद्ध क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांची पत्नी असल्याचा दावा करत आहे. या महिलेची अवस्था दयनीय अवस्थेत असल्याचे दिसत आहे. ही महिला स्वत:चं नाव रेखा श्रीवास्तव असल्याचे सांगितले आहे. व्हिडीओमध्ये शांत आवाजात ही महिला माजी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांची पत्नी असल्याचे सांगत आहे.
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
ती महिला कधीकाळी दुबईमध्ये आलिशान जीवन जगत होती. तिचा एअरलाईन्स, ट्रॅव्हल बिझनेस होता आणि ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होती. मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली असून ती बेघर झाली आहे आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात रस्त्यावर किंवा आश्रयगृहांमध्ये दिवस काढत असल्याचा दावा व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. ही महिला बेलापूर स्टेशनजवळ सापडल्याचे सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंनुसार, रेखा श्रीवास्तव एकेकाळी दुबईमध्ये आरामात जीवन जगत होत्या आणि तिथे एअरलाइन आणि ट्रॅव्हल व्यवसाय चालवत होत्या. व्हिडिओमध्ये त्या सलीम दुर्रानी यांची पत्नी असल्याचा दावाही करतात. आज त्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांची अवस्था पाहून काही सामाजिक कार्यकर्ते आणि एक महिला पोलिस अधिकारी त्यांना निवारा केंद्रात घेऊन जातात आणि काळजी घेत आहेत. यावेळी चौकशीदरम्यान, त्या महिलेने मोठी माहिती उघड केली.
व्हिडीओमध्ये अनेक दावे
व्हायरल व्हिडीओनुसार, ही महिला (रेखा श्रीवास्तव) सध्या एका धार्मिक शहरात अतिशय दयनीय अवस्थेत दिसत आहे. जामनगरमध्ये राहणाऱ्या सलीम दुर्रानी यांच्या कुटुंबाकडून रेखा श्रीवास्तव यांच्या दाव्यांना अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. सलीम दुर्रानी यांच्या आयुष्यात "रेखा श्रीवास्तव" नावाची पत्नी असल्याचा किंवा दुबई एअरलाइन्सशी कोणताही संबंध असल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. हे व्हायरल दावे आणि वास्तव यांच्यातील फरक असल्याचे दिसून येत आहे. कागदोपत्री असे काही नसल्याचे दिसत आहे.
सलीम दुर्रानी कोण होते?
सलीम दुर्रानी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे झाला. ते फक्त आठ महिन्यांचे होते तेव्हा त्यांचे कुटुंब कराची येथे गेले आणि नंतर भारताच्या फाळणीच्या वेळी गुजरातमधील जामनगर येथे स्थायिक झाले. त्यांचे वडील अब्दुल अझीझ हे देखील एक क्रिकेटपटू होते.