VIDEO: 'दिल चीर के देख तेराही नाम होगा'; पतीनं गाणं म्हणताच पत्नी सुरा घेऊन लागली मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 01:12 PM2021-06-19T13:12:57+5:302021-06-19T13:13:17+5:30

हृदय चिरुन दाखवण्याची पत्नीची मागणी; पती वैतागून हायवेवर धावू लागला

The Wife Lying Behind With A Knife To Take Out The Husbands Heart Funny Video Goes Viral | VIDEO: 'दिल चीर के देख तेराही नाम होगा'; पतीनं गाणं म्हणताच पत्नी सुरा घेऊन लागली मागे

VIDEO: 'दिल चीर के देख तेराही नाम होगा'; पतीनं गाणं म्हणताच पत्नी सुरा घेऊन लागली मागे

Next

घराबाहेर, मित्रांसमोर प्रत्येकजण हुशाऱ्या मारतो. मात्र घरात पत्नीसमोर नवऱ्यांची अवस्था बिकट असते. मित्रांमध्ये, ऑफिसमध्ये इतरांना शहाणपणा शिकवणाऱ्या अनेकांची घरात पत्नीसमोर डाळ शिजत नाही. पत्नी म्हणेल ती पूर्व दिशा, हेच अनेकांचं धोरण असतं. घराबाहेर पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांना सल्ले देणारी, राजकारणपासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत अधिकारवाणीने बोलणारी अनेक मंडळी घरी येताच गृहमंत्र्यांसमोर अक्षरश: चिडीचूप होतात. अशा मंडळींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सध्या इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक माणूस जीव मुठीत घेऊन पळत आहे. हा माणूस कोण, कुठला याची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही. मात्र तो अगदी जिवाच्या आकांतानं स्वत:ची व्यथा मांडत पळताना दिसत आहे. 'कृपया मला वाचवा. माझी पत्नी माझा जीव घेईल,' असं ही व्यक्ती गयावया करत बोलत आहे.

पत्नी आपल्या मागे काय लागली आहे, याचंही कारण संबंधित व्यक्तीनं पुढे सांगितलं. 'काल माझ्या पत्नीनं मला विचारलं, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? त्यावर उत्तर देताना मी 'दिल चीर के देख तेराही नाम होगा असं उत्तर दिलं. तेव्हापासून ती सुरी घेऊन माझ्या मागे लागली आहे. तिला माझं हृदय चिरून पाहायचं आहे की मी तिच्यावर किती प्रेम करतो,' अशा शब्दांत या व्यक्तीनं त्याची व्यथा मांडली आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The Wife Lying Behind With A Knife To Take Out The Husbands Heart Funny Video Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app