बाबो! सीक्रेट कॅमेऱ्याने पतीची पोलखोल केली; सत्य समजताच पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 12:00 IST2021-11-13T11:55:27+5:302021-11-13T12:00:32+5:30
Wife installed secret camera husband caught on camera : पत्नीने आपल्या पतीला पकडण्यासाठी घरामध्ये एक सीक्रेट कॅमेरा लावला होता. त्यामध्ये तिच्यासमोर धक्कादायक प्रकार आला आहे.

बाबो! सीक्रेट कॅमेऱ्याने पतीची पोलखोल केली; सत्य समजताच पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली
पती-पत्नीमध्ये अनेकदा विविध कारणांवरून वाद होत असतात. कधी कधी एकमेकांबद्दल असलेल्या संशयातून हे वाद पुढे टोकाला जातात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. घरातील सीक्रेट कॅमेऱ्याने पतीची पोलखोल केली आहे. सत्य समजताच पायाखालची जमीनच सरकल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेला घरामध्ये मैत्रिणीसोबत पती रंगेहात सापडला आहे. पत्नीने आपल्या पतीला पकडण्यासाठी घरामध्ये एक सीक्रेट कॅमेरा लावला होता. त्यामध्ये तिच्यासमोर हा धक्कादायक प्रकार आला आहे.
महिलेना आपली बेस्ट फ्रेंड आणि पती यांच्यासोबत झालेल्या भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ जवळपास 9 मिलियन वेळा पाहण्यात आला आहे. टिकटॉकवर शौना नावाच्या एका महिलेने व्हिडीओ शेअर केला आहे. शौनाने यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मला एक संशय येत होता. माझी मैत्रीण माझ्याच घरी राहत आहे. तिच्यात आणि पतीमध्ये विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. मात्र माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता. तो मिळावा यासाठी मी घरात एक सीक्रेट कॅमेरा लावला. ज्यामुळे मला त्या दोघांनाही पकडता आलं असं म्हटलं आहे.
सीक्रेट कॅमेरा कामी आला; घरामध्ये मैत्रिणीसोबत पती रंगेहात सापडला
शौनाने व्हिडीओमध्ये आपल्या बेस्ट फ्रेंडला प्रश्न विचारला आहे. ती म्हणते, मी जेव्हा कामावर जात होते, तेव्हा तू माझ्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवत होतीस? हो की नाही?? यावर तिची मैत्रिण यास नकार देते आणि त्यानंतर शौनाचा पती येऊन आरडाओरडा करू लागतो. हा व्हिडीओ आतापर्यंत 9.1 मिलियनपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओपूर्वी आणखी एक व्हिडीओ आहे ज्यात शौनाने जेव्हा तुम्ही आपल्या मैत्रिणीला घरात राहायला जागा देता आणि ती तुम्ही कामावर गेल्यानंतर तुमच्याच पतीसोबत शारीरिक संबंध ठेवते. मात्र तुम्ही घरात सीक्रेट कॅमेरा लावल्याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही असं कॅप्शन दिलं आहे.