रेल्वे ट्रॅकवर पाण्याच्या बॉटल का फेकू नये? व्हिडीओ बघून पुन्हा करणार नाही अशी चूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:35 IST2025-02-07T13:34:35+5:302025-02-07T13:35:12+5:30
Indian Railway : काही लोक रेल्वे प्रवासादरम्यान पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल रेल्वेच्या ट्रॅकवर फेकतात. पण लोकांना हे माहीत नसतं की, की, असं केल्यानं किती मोठं नुकसान होतं.

रेल्वे ट्रॅकवर पाण्याच्या बॉटल का फेकू नये? व्हिडीओ बघून पुन्हा करणार नाही अशी चूक!
Indian Railway : भारतात रोज कोट्यावधी लोक रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेनं सुरक्षित आणि आरामदायक प्रवास होतो म्हणून रेल्वेला अधिक प्राधान्य दिलं जातं. अशात भारतीय रेल्वेची प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, काही लोक बऱ्याच चुका करतात आणि रेल्वे संपत्तीचं नकळत नुकसान करतात. तुम्हीही अनेकदा पाहिलं असेल की, काही लोक रेल्वे प्रवासादरम्यान पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल रेल्वेच्या ट्रॅकवर फेकतात. पण लोकांना हे माहीत नसतं की, की, असं केल्यानं किती मोठं नुकसान होतं.
सोशल मीडियावर यासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्या रेल्वेच्या ट्रॅकवर पाण्याच्या बॉटल न फेकण्याबाबत जागरूकता पसरवली जात आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून यूजर्स सकारात्मक प्रतिक्रियाही येत आहेत. तर काही लोक रेल्वे ट्रॅकवर कधीच पाण्याच्या बॉटल न फेकण्याचा निश्चय करत आहेत.
हा व्हिडीओ रेल्वेनं प्रवास करणाऱ्या लोकांना जागरूक करण्यासाठी बनवण्यात आला आहे. ज्यात रेल्वे स्टेशन कंट्रोल रूममध्ये सिग्नल देताना जेव्हा अधिकाऱ्याला समस्या येते, तेव्हा अधिकारी कर्मचाऱ्याला पाठवून ट्रॅकची तपासणी करायला पाठवतात. जेव्हा कर्मचारी घटनास्थळी पोहोचतात तेव्हा ट्रॅकवर चेंजिंग पॉइंटवर बॉटल अडकलेल्या दिसतात. कर्मचारी पाण्याच्या बॉटल काढून फेकतात आणि कंट्रोल रूमला फोन करून अधिकाऱ्याला सिग्नल चेक करण्यास सांगतात. कर्मचारी त्यांना पॉइंटवर प्लास्टिकची बॉटल अडकली असल्याची माहिती देतो. तेव्हा व्यक्ती सांगतो की, की, रेल्वे ट्रॅकवर पाण्याच्या बॉटल फेकल्यानं पॉइंट जाम होतो.
ट्रेन से पानी की बोतल फेंकना आसान है लेकिन उसका दुष्प्रभाव भी देखिए।
— Ashwani Dubey (@ashwani_dube) February 4, 2025
Worth Sharing. @AshwiniVaishnaw Ji pic.twitter.com/9jfhip2R2E
ट्रॅकवर बॉटल फेकून कचरा तर होतोच, सोबतच रेल्वे लेट होतात. ज्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. सोबतच मोठ्या दुर्घटनेचाही धोका राहतो. याच कारणानं रेल्वे ट्रॅकवर पाण्याच्या बॉटल फेकू नये. हा व्हिडीओ एक्स अकाऊंटवर @ashwani_dube नावाच्या यूजरनं शेअर केला आहे. कॅप्शनला लिहिलं आहे की, रेल्वेतून पाण्याची बॉटल फेकणं सोपं आहे, पण त्याचा दुष्परिणाम बघा. पोस्टमध्ये यूजरनं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही टॅग केलं आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि १४ हजारांपेक्षा जास्त लोकांना लाइक केलं आहे.