शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
2
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
3
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
4
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
5
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
6
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
7
चंद्रपूर: EVMचे बटण दाबूनही लाईट लागेना, तांत्रिक कारणामुळे काही केंद्रांवर प्रक्रिया थांबली
8
"मला iPhone 17 Pro Max हवाय"; तरुणाचा भाजपा खासदाराला फोन, मजेदार ऑडिओ व्हायरल
9
Bus Fire: ट्रकला धडकल्यानंतर बस पेटली; ३ जणांचा होरपळून मृत्यू, २३ जण जखमी
10
Mumbai Hit And Run: मैत्रिणीला ढकलून वाचवला जीव; पोलिस व्हॅनच्या धडकेत आयटीआय विद्यार्थी जखमी
11
SMAT 2025 : अर्जुन तेंडुलकरनं IPL इतिहासातील महागड्या गड्याला स्वस्तात तंबूत धाडलं; पण...
12
Video - संतापजनक! "म्हातारे, मी तुझं बुटाने तोंड फोडेन, तू..."; वृद्ध महिलेला पोलिसाची धमकी
13
तात्पुरत्या शिक्षकांना पेन्शन, अन्य सेवा लाभ नाकारू नयेत; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
14
महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू; Whatsapp स्टेटसमुळे घटना उघडकीस, हत्येचा दावा
15
दिल्ली बॉम्बस्फोटाचं हमास कनेक्शन! हल्ल्यासाठी ड्रोन वापरायचा कट; दहशतवादी दानिशच्या फोनमधून मोठा खुलासा
16
IPL 2026: ग्लेन मॅक्सवेलची कारकीर्द धोक्यात? पंजाबने सोडलं, आता लिलावातून बाहेर, कारण काय?
17
"सरकार-बँका मला आणि जनतेला किती काळ फसवत राहणार?" विजय माल्ल्याचे सरकारला पुन्हा सवाल
18
"धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराजांनी वाचवलेलं"; रत्नाकर गुट्टेंचा मोठा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानात आज अचानक काय घडतंय?, राष्ट्रपतींनी बोलावली संसदेची बैठक; शहबाज परदेशातून परतले
20
अरे देवा! "...म्हणूनच तो हनिमूनच्या रात्री पळून गेला", ५ दिवसांनी सापडला गायब झालेला नवरदेव
Daily Top 2Weekly Top 5

पाणी भरुन प्लास्टिक पिशवी घरात टांगली तर खरंच डास आणि माश्या घरात येत नाही? पाहा खरंखुरं उत्तर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:27 IST

Water bag in balcony : सोशल मीडियावर काही फोटोत किंवा व्हिडिओत लोक बाल्कनीमध्ये पिशवीत पाणी टांगून ठेवताना दिसतात. पण याचं कारण काय?

Water bag in balcony :  बदलत्या हवामानात तब्येत बिघडण्याची शक्यता अधिक असते. या काळात अनेक आजारांचा धोका वाढतो. कारण, हवामान बदलताना तापमान आणि आर्द्रतेत बदल होतो, ज्यामुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया वाढतात. आपल्या शरीराला या बदलाशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि त्यामुळे आपण पटकन आजारी पडतो.

लोक पाण्याची पिशवी का टांगत आहेत?

हवामान बदलताच मच्छरांची संख्या वाढते. मच्छर वाढल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच मच्छरांना घरात येण्यापासून थांबवणं खूप महत्त्वाचं आहे. अलीकडे सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात लोक घराच्या बाल्कनीत पाण्याने भरलेली प्लास्टिकची पिशवी टांगत आहेत.

काय करावं?

एक पारदर्शक प्लास्टिक पिशवी घ्या. त्यात अर्धी पिशवीभर स्वच्छ पाणी भरा. त्या पाण्यात अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा एक छोटा गोळा टाका. आता ही पिशवी खिडकी किंवा बाल्कनीत टांगून ठेवा.

आरोग्य टिकवण्यासाठीचा हा सोपा उपाय?

हा उपाय केल्यानं घरातील मच्छर आणि माशा कमी होऊ शकतात. त्यामुळे मलेरिया किंवा इतर मच्छरजन्य आजारांपासून काही प्रमाणात संरक्षण मिळू शकतं. याचबरोबर, माशा अन्नावर बसल्यास गट हेल्थ खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनाही दूर ठेवणं आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.

हा उपाय खरंच काम करतो का?

सोशल मीडियावर सांगितल्याप्रमाणे, पाणी आणि अ‍ॅल्युमिनियम फॉइलच्या रिफ्लेक्शनमुळे डास आणि माशा दूर राहतात, असा दावा केला जातो. मात्र काही वापरकर्त्यांनी सांगितलं आहे की, त्यांना या उपायाने फारसा फरक जाणवला नाही. त्यामुळे हा उपाय पूर्णतः शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध नाही, पण नैसर्गिक आणि हानीकारक नसल्यामुळे वापरून पाहणं हरकत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Water bag mosquito repellent trend: Does it really work?

Web Summary : A viral trend involves hanging water bags to repel mosquitoes and flies. While some claim it works due to light reflection, its effectiveness lacks scientific proof. It's harmless to try.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके