AI Based Astrology: जगभरात भविष्य, ज्योतिष यावर विश्वास असणारे अब्जावधी लोक आहेत. दररोज वृत्तपत्रात येणारे भविष्य न चुकता पाहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु, आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे भविष्य सांगणारे तंत्र एका २० वर्षीय विद्यार्थाने विकसित केले आहे. केवळ १० दिवसांत त्यांनी भविष्य सांगणारे AI इंजिन तयार केले असून, २४ तासांत ३४ कोटी रुपयांची मदत या मुलाला मिळाली आहे.
गुओ होंगशियांग या चिनी विद्यार्थ्याने गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गजांना मागे टाकत एक भविष्य सूचक एआय (AI) तयार केले आहे. यामुळे तो जगातील क्रमांक १ डेव्हलपर ठरला आहे. बीजिंग विद्यापीठाचा पदवीधर असलेल्या गुओने, मिरोफिश (MiroFish) नावाचे हे एआय इंजिन अवघ्या १० दिवसांत विकसित केले. हा केवळ एक सामान्य चॅटबॉट नसून, एक भविष्यवेधी चॅटबॉट आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, हे इंजिन एक कृत्रिम मॉडेल तयार करून संभाव्यतेच्या आधारावर भविष्याचा अंदाज वर्तवतो. १० लाख एआय एजंट्सची एक संपूर्ण टीम तयार करू शकतो. त्यांच्या वर्तणुकीच्या परिणामांच्या आधारे, वास्तविक जगात काय घडू शकते, याचा अंदाज लावू शकतो.
नवीन प्रणाली भविष्याचा अंदाज वर्तवते
गुओ होंगशियांगचा एआय चॅटबॉट 'व्हाइब कोडिंग' नावाच्या तंत्रज्ञानावर चालतो. हे तंत्रज्ञान वेगाने कोडिंग करण्यासाठी एआयचा वापर करते. त्याला त्याच्या कामासाठी चीनचे माजी सर्वात श्रीमंत व्यक्ती चेन तियानकियाओ यांच्याकडून २४ तासांच्या आत ४.१ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ३४ कोटी रुपये) निधी मिळाला. विशेष म्हणजे, त्याच्या 'बेटाफिश' नावाच्या चॅटबॉटची आधीची आवृत्ती भूतकाळातील घटनांचे विश्लेषण करत असे, तर नवीन प्रणाली भविष्याचा अंदाज वर्तवते.
एआयने क्षमता सिद्ध करून दाखवली
मिरोफिश ओएसिस नावाच्या इंजिनवर चालते. ते एका आभासी परिस्थितीचे अनुकरण करते, एआय एजंट्स कसे वागतात, याचे निरीक्षण करते. यामुळे एखादी नवीन माहिती किंवा धोरण यावर कशी प्रतिक्रिया मिळू शकते, हे समजणे सोपे होते. या एआयने दोन उदाहरणांमध्ये आपली क्षमता दाखवून दिली आहे. एका विद्यापीठातील वादविवादात, लोकांचा संताप केव्हा आणि कसा बदलेल, याचे त्याने अचूक भाकीत केले. तसेच शतकांपूर्वी लुप्त झालेल्या 'ड्रीम ऑफ द रेड चेंबर' या प्रसिद्ध कादंबरीचा शेवट त्याने लिहिला. तथापि, याला मर्यादाही आहेत. सिम्युलेशन चालवणे खर्चिक आहे. एआय एजंट कधीकधी खऱ्या मानवांपेक्षाही अधिक आक्रमकपणे वागतात. असे असले तरी, तज्ज्ञांचा विश्वास आहे की भविष्य सांगण्याच्या साधनावर चीनची पकड या तंत्रज्ञानाने मिळवली आहे.
Web Summary : A 20-year-old Chinese student developed an AI engine that predicts the future, raising millions. The AI uses simulations to forecast outcomes, even predicting social behavior and completing literary works. Experts believe China now has an edge in predictive technology.
Web Summary : 20 वर्षीय चीनी छात्र ने भविष्य बताने वाला AI इंजन बनाया, जिससे लाखों मिले। AI भविष्य का अनुमान लगाने के लिए सिमुलेशन का उपयोग करता है, सामाजिक व्यवहार की भविष्यवाणी करता है और साहित्यिक कार्यों को पूरा करता है। विशेषज्ञों का मानना है कि चीन को भविष्य कहने वाली तकनीक में बढ़त मिली है।