अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:26 IST2025-08-20T15:25:50+5:302025-08-20T15:26:19+5:30
Amul Girl: अखंड भारतात दोनच गर्ल प्रसिद्ध आहेत, त्या म्हणजे अमूल गर्ल आणि पारले गर्ल. निरमा गर्ल होती, परंतू आता निरमा कालबाह्य झाल्याने लोक तिला विसरले आहेत. यापैकी अमूल गर्ल या दोन सख्ख्या बहिणी आहेत, हे जास्त लोकांना माहिती नाहीय.

अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
अखंड भारतात दोनच गर्ल प्रसिद्ध आहेत, त्या म्हणजे अमूल गर्ल आणि पारले गर्ल. निरमा गर्ल होती, परंतू आता निरमा कालबाह्य झाल्याने लोक तिला विसरले आहेत. यापैकी अमूल गर्ल या दोन सख्ख्या बहिणी आहेत, हे जास्त लोकांना माहिती नाहीय. त्याहून मोठे सिक्रेट म्हणजे या मुली राजकीय वर्तुळात कायम चर्चेत असलेल्या शशी थरूर यांच्या सख्ख्या बहिणी आहेत.
१९६१ मध्ये भारतात श्वेत क्रांती सुरू होत होती, तेव्हा अमूलला आपली छाप पाडण्यासाठी एका लहान मुलीचा चेहरा हवा होता. ७०० च्या वर फोटो पाहिल्यानंतर अमुलला ती मुलगी सापडली होती. जाहिरात क्षेत्रातील दिग्गज सिल्वेस्टर दा कुन्हा यांच्या नजरेत या लहान मुलीचा चेहरा बसला आणि त्यांनी थरुर कुटुंबातील मुलगी शोभाची निवड केली. तेव्हा कृष्णधवल फोटो होता. पुढे जेव्हा रंगीत झाला तेव्हा तोच चेहरा अमुलला हवा होता. कारण त्या चेहऱ्याची ठेवण, ओळख बदलायची नव्हती. यामुळे रंगीत स्वरुपात जाहिराती सुरु होताच थरुर कुटुंबातीलच शोभाची सख्खी बहीण स्मिता हिची निवड करण्यात आली.
अमूल गर्ल आणि शशी थरूर यांच्यात काही संबंध आहे? हा विषय सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांनी शोभा हिचा फोटो काढला होता. कुन्हा यांनी चंद्रन थरूर यांच्याशी संपर्क करून मुलीचे फोटो पाठविण्यास सांगितले होते. पोल्का डॉट ड्रेस आणि पोनीटेलमध्ये असलेला शोभाचा फोटो कुन्हा यांना भावला. २०१६ मध्ये शशी थरुर यांनी आपल्या बहिणींवर अमूल बेबी म्हणून लेख लिहिला होता. तेव्हा हे सिक्रेट सर्वांसमोर आले होते. शोभा आणि स्मिता या शशी थरूर यांच्या सख्ख्या लहान बहिणी आहेत, हे आजही लोकांना नवे आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आता आम्हाला हे सिक्रेट समजल्याचे म्हटले आहे.