Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:31 IST2025-12-17T15:28:38+5:302025-12-17T15:31:21+5:30
Who Is Payal Gaming: सध्या सोशल मिडिया आणि गुगलवर पायल गेमिंग हे नाव प्रचंड ट्रेंड होत आहे.

Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
सध्या सोशल मिडिया आणि गुगलवर पायल गेमिंग हे नाव प्रचंड ट्रेंड होत आहे. मात्र, चर्चेत येण्यामागचे कारण अत्यंत धक्कादायक आहे. या लोकप्रिय महिला गेमरचा एक खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, इंटरनेटवर खळबळ माजली आहे. परंतु, प्राथमिक माहिती आणि चाहत्यांच्या दाव्यानुसार हा व्हिडिओ डीपफेक टेक्नोलॉजीचा वापर करून तयार करण्यात आला आहे. तसेच पायलची बदनामी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले.
कोण आहे पायल गेमिंग?
पायल गेमिंगचे खरे नाव पायल धारे असून ती मध्य प्रदेशातील २१ वर्षांची तरुणी आहे. अत्यंत कमी वयात तिने गेमिंग विश्वात स्वतःचे साम्राज्य उभे केले आहे. २०१९ मध्ये तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. पबजी, जीटीए व्ही आणि बॅटलग्राउंट मोबाईल इंडियासारख्या गेमच्या माध्यमातून प्रचंड प्रसिद्ध मिळवली. पायलने अवघ्या दोन वर्षांत १० लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठला. इतकेच नव्हे तर, युट्यूबवर ३० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गेमर ठरली आहे. सध्या तिचे युट्यूबवर ४.५ दशलक्ष तर इंस्टाग्रामवर ४.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
'तो' व्हिडीओ डीपफेक असल्याचा दावा
पायल धारेच्या नावाने जो व्हिडिओ व्हायरल केला जात आहे, तो बनावट असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या काही काळात रश्मिका मंदाना, आलिया भट्ट यांसारख्या मोठ्या अभिनेत्रींनंतर आता सोशल मीडिया इन्फ्लुएंसरला डीपफेकचे लक्ष्य केले जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चुकीचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा चेहरा दुसऱ्याच्या शरीरावर लावून असे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले जातात.
कडक कारवाईची मागणी
पायलच्या चाहत्यांनी या कृत्याचा निषेध केला असून, सायबर पोलिसांनी अशा प्रवृत्तींविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. या घटनेमुळे इंटरनेटवरील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.