स्केटिंग करताना घसरली चिमुकली पण उभी राहत गेली सर्वांच्या पुढे....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 19:03 IST2021-07-04T19:03:20+5:302021-07-04T19:03:56+5:30
काही मुलं जन्मजातच इतकी हुशार असतात की त्यांचे कौतुक करावे तितकेच कमी. ही मुले त्यांच्या टॅलेंटने अगदी थोरामोठ्यांनाही मागे टाकतात. असाच इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात तिच्या टॅलेंट इतकीच तिच्या पॉझीटीव्ह अॅटिट्युडची चर्चा होतेय.

स्केटिंग करताना घसरली चिमुकली पण उभी राहत गेली सर्वांच्या पुढे....
काही मुलं जन्मजातच इतकी हुशार असतात की त्यांचे कौतुक करावे तितकेच कमी. ही मुले त्यांच्या टॅलेंटने अगदी थोरामोठ्यांनाही मागे टाकतात. असाच इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात तिच्या टॅलेंट इतकीच तिच्या पॉझीटीव्ह अॅटिट्युडची चर्चा होतेय.
या छोट्या मुलीचं नाव मिया आहे. तिचा रोलर स्केटिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ती रोलर स्केटिंगच्या स्पर्धेत सहभागी झाली आहे. हा व्हिडिओ डुगास नामक अकाऊंटवर शेअर करण्यात आला होता. या अकाऊंट होल्डरच्या मते याचा मुळ व्हिडिओ तब्बल ५० करोड लोकांनी पाहिला. तर इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला ५८ हजार व्हिव्स मिळाले.
यामध्ये मिया रोलर स्केटिंग करताना अडखळते. तिला पाहताच आपण सर्व दचकतो. आपल्याला वाटते पुढे काय होईल. पण मिया नुसतीच उभी राहत नाही तर ती सर्वांना मागे टाकून ही स्पर्धा जिंकते. तिच्या या पॉझीटीव्ह अॅटिट्यु़डचं सोशल मिडियावर फार कौतुक होत आहे.