बॉसने सॅलरी वाढवली नाही, म्हणून त्यानं केलं 'हे' भयानक कृत्य, जेसीबी घेऊन आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 06:39 PM2021-09-15T18:39:58+5:302021-09-15T18:40:57+5:30

एका एम्प्लॉईला मात्र त्याच्या बॉसचा इतका राग आला की संतापाच्या भरात त्यानं भयानक कृत्य केलं. पाहा या व्हिडिओमध्ये त्याने काय केलं ते...

when salary was not increased employee destroyed vehicles funny video goes viral | बॉसने सॅलरी वाढवली नाही, म्हणून त्यानं केलं 'हे' भयानक कृत्य, जेसीबी घेऊन आला अन्...

बॉसने सॅलरी वाढवली नाही, म्हणून त्यानं केलं 'हे' भयानक कृत्य, जेसीबी घेऊन आला अन्...

Next

अनेक एम्प्लॉई आपल्या बॉसवर खुश नसतात. पगार न वाढवणारा, चिडचिड करणारा बॉस कोणालाच नको असतो. मग अशावेळी एम्प्लॉई काय करतात जास्तीत जास्त तक्रार करतात, नोकरी सोडून देतात किंवा अगदीच गरज असेल तर ती नोकरी त्याच परिस्थीतीत करतात. एका एम्प्लॉईला मात्र त्याच्या बॉसचा इतका राग आला की संतापाच्या भरात त्यानं भयानक कृत्य केलं. पाहा या व्हिडिओमध्ये त्याने काय केलं ते...

या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की एका जेसीबी मशिनच्या साह्य्याने तो नोकर कशा मालकाच्या गाड्या तोडतोय. त्याला पाहताच इतर लोक धावत गेले पण हा पठ्ठया ऐकेल तर शपथ हा तर गाड्या तोडतोच आहे. कोणाचंही न ऐकता त्यानं हे काम सुरुच ठेवलंय.

ट्वीटरवर बेस्ट व्हिडिओ या हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी कंमेट्सचा वर्षाव केलाय. एकाने तर म्हटलंय हा व्हिडिओ प्रत्येक कंपनीच्या बॉसला पाठवला पाहिजे.

 

Web Title: when salary was not increased employee destroyed vehicles funny video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.