Video : कोर्टातून दोन आरोपी गेले पळून, न्यायाधीशांनी पाठलाग करुन पुन्हा आणले धरुन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 13:38 IST2018-10-26T13:36:56+5:302018-10-26T13:38:28+5:30
कोर्टात सुनावणी सुरु असताना दोन आरोपी पळून गेल्याची अजब घटना...

Video : कोर्टातून दोन आरोपी गेले पळून, न्यायाधीशांनी पाठलाग करुन पुन्हा आणले धरुन!
कोर्ट म्हटलं की, कडक पोलीस बंदोबस्त असं साधारण चित्र कुणाच्याही डोळ्यांसमोर उभं राहतं. पण एका कोर्टात एक धक्कादायक प्रकार घडला. कोर्टात सुनावणी सुरु असताना दोन आरोपी पळून गेल्याची अजब घटना अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये घडली आहे. इतकेच नाही तर न्यायाधीशांनीच त्यांचा पाठलाग करत त्यांना पुन्हा पकडलं.
न्यायाधीश आर.डब्ल्यू बजार्ड हे दोन गुन्हेगारांच्या प्रकरणाची सुनावणी करत होते. अशातच अचानक दोन्ही आरोपी तेथून पळून गेले. आश्चर्याची बाब म्हणजे न्यायाधीश जराही वेळ न घालवता त्यांच्यामागे धावू लागले. न्यायाधीशांनी आपला काळा कोट एका झटक्यात काढला आणि तेही त्यांना पकडण्यासाठी वेगाने धावू लागले.
या घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे की, कशाप्रकारे दोन आरोपी कोर्टातून पळून जात आहेत. तसेच न्यायाधीश कशाप्रकारे त्यांचा पाठलाग करत आहेत. न्यायाधीशांनी दोघांनाही पकडलं आणि दोघांवर एक वेगळी केसही लावली.