मादा अजगराने झाडावरच दिला पिल्लाला जन्म, व्हिडीओ पाहून लोक झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 01:28 PM2021-09-29T13:28:32+5:302021-09-29T13:32:31+5:30

काही लोक असंही म्हणाले की, आम्हाला बालपणापासून हेच माहीत होतं की, साप केवळ अंडी देतो. पण ज्याप्रकारे अजगराने झाडावर ओपन डिलिव्हरी केली, ते बघून सगळेच हैराण झाले आहेत.

When boa gives live delivery on tree shocking video | मादा अजगराने झाडावरच दिला पिल्लाला जन्म, व्हिडीओ पाहून लोक झाले हैराण

मादा अजगराने झाडावरच दिला पिल्लाला जन्म, व्हिडीओ पाहून लोक झाले हैराण

Next

एका अजगराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक मादा अजगर झाडावरच छोट्या अजगराला जन्म देत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. काही लोक असंही म्हणाले की, आम्हाला बालपणापासून हेच माहीत होतं की, साप केवळ अंडी देतो. पण ज्याप्रकारे अजगराने झाडावर ओपन डिलिव्हरी केली, ते बघून सगळेच हैराण झाले आहेत.

अजगराचं पिल्लू बऱ्याच संघर्षानंतर या जगात येतं. व्हिडीओत बघू शकता की, पिल्लू जन्माला आल्यानंतर ते त्याच्या आईला कसं बिलगत आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ @sara_s_2020 यूजरने शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 

सापांचे तसे तर अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण असा नक्कीच पाहिला नसेल. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मुळात हा व्हिडीओ जुना आहे. मात्र आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत आश्चर्य व्यक्त केलं आहे.
 

Web Title: When boa gives live delivery on tree shocking video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.