काय सांगता! वाहतूक पोलिसांनी कार चालकाला दंड केला; हेल्मेट का घातले नाही असं विचारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:05 IST2025-07-24T14:02:17+5:302025-07-24T14:05:25+5:30
एका वाहतूक पोलिसांनी एका कार चालकाला हेल्मेट न वापरल्याबद्दल दंड केला आहे.

काय सांगता! वाहतूक पोलिसांनी कार चालकाला दंड केला; हेल्मेट का घातले नाही असं विचारलं
सध्या सोशल मीडियावर एका वाहतूक पोलिसाने केलेल्या दंडाची जोरदार चर्चा सुरू आहे. वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घातल्याबद्दल एका कार चालकाला दंड ठोठावला आहे. ही घटना मंगळवारी बिहारमधील पंजवारा पोलीस ठाणे परिसरातील रकोली गावात घडली.
ऋषिकेश झा त्यांच्या कारने शंभूगंजला जात होते त्यावेळी वाहतूक पोलिसांनी इंग्लिश मोर-शंभूगंज रस्त्यावर चालकांची तपासणी केली. काही वेळाने ऋषिकेश यांना त्यांच्या मोबाईलवर एक हजार रुपयांच्या ऑनलाइन चलनाचा मेसेज आला.
या चालानमध्ये असे म्हटले होते की, दुचाकीवरून येणाऱ्या दोन व्यक्तींनी हेल्मेट न घातल्याबद्दल दंड भरला आहे. ते कार चालवत होते. त्यांच्या कारचे चालान आले आहे, पण या चालानवर हेल्मेट न घातल्याबद्दल दंड केला आहे.
जुन्या स्कूटरला अनोखा निरोप!
या प्रकरणी वाहतूक पोलिस ठाण्याचे प्रभारी संजय सत्यार्थी म्हणाले की, ही मानवी चूक होती. प्रत्यक्षात, मानकांपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्याचा एक प्रकार घडला होता, पण तांत्रिक चुकीमुळे हेल्मेट न घातल्याबद्दल चालान जारी करण्यात आले.
"ही चूक दुरुस्त करण्याचा पर्याय उपलब्ध आहे आणि तक्रार मिळाल्यावर आवश्यक ती दुरुस्ती केली जाईल. या घटनेमुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आपण आयुष्यात पहिल्यांदा खरेदी केलेल्या वस्तुवर आपले जास्त प्रेम असते. ती वस्तू कितीही जुनी झाली तरीही आपण ती वस्तू विकत नाही, किंवा भंगारामध्ये देत नाही. ती वस्तु आपल्या घरामध्ये पडून राहते पण आपण कोणाला देत नाही. सहसा आपल्याकडे पहिली घेतलेली गाडी विकण्याची इच्छा होत नाही. अशीच एक घटना गुजरातमधून आली, येथील एका गायकाने आपली पहिली बाईक विकली नाही तर त्या बाईकचे आपल्या घरासमोर स्मारक करण्याचा निर्णय घेतला.
गुजरातचे प्रसिद्ध लोकगायक जिग्नेश कविराज यांच्या कुटुंबाने त्यांच्या जुन्या स्कूटरला भंगारात देण्याऐवजी किंवा दुसऱ्याला विकण्याऐवजी एक अनोखा निरोप दिला आहे. खरं तर, त्यांच्या लाडक्या स्कूटरला मेहसाणा जिल्ह्यातील खेराळू गावात जिग्नेश कविराज यांच्या घरासमोर पुरण्यात आले आहे.