शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

हृदयद्रावक! मुलाला कोरोना झाला म्हणून बापानं नातंच तोडलं; स्टेशनवर सोडून गेला पळून  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 15:37 IST

father broke relationship with his covid infected son : काही तासांच्या तपासणीनंतर  लहान मुलाला त्याच्या नातेवाईकांकडे पोहोचवलं.

(Image Credit- Facebook, Rilway Children india) 

कोरोनाने देशभरातील जवळपास सगळ्याच राज्यात कहर केला आहे. या भयानक साथीच्या परिणामाचा मानवी आरोग्यावर तसेच नातेसंबंध आणि माणुसकीवर खूप परिणाम झाला आहे. अशी प्रकरणे सतत समोर येत आहेत, ज्यामध्ये कोरोनामुळे लोकांना त्यांचे नातेवाईक सोडून जात आहेत

अशा स्थितीत आता कोलकात्यातून असाच प्रकार समोर आला आहे. येथे एका लहान मुलाला कोरोना संसर्ग झाला आणि वडील त्याला स्टेशनवर सोडून निघून गेले. समोर आलेल्या माहितीनुसार कोलकाताच्या सियालदह रेल्वे स्टेशनवर १४ वर्षांचा मुलगा रडताना दिसून आला.

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

या मुलाकडे कोरोना संक्रमित असल्याचा रिपोर्टही होता. पोलिसांनी याबाबत माहिती मिळताच रेस्क्यू करून चाईल्ड लाईनकडे या मुलाला सुपूर्त केलं. काही तासांच्या तपासणीनंतर लहान मुलाला त्याच्या नातेवाईकांकडे पोहोचवलं.

माणुसकीला सलाम! आई वडिलांना कोरोना संसर्ग; महिला पोलिसानं ६ महिन्यांच्या बाळाचा केला सांभाळ

आता या मुलाची स्थिती बरी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येताच  वडील घाबरले होते. त्यानंतर ते आपल्या मुलाला बेवारस अवस्थेत स्टेशनला सोडून पळून गेले. पोलिसांनी सदर घटनेतील वडीलांची समजूत काढली आणि मुलाला त्यांच्या हवाली केले. 

 महिला पोलिसानं ६ महिन्यांच्या बाळाचा केला सांभाळ

दिल्लीत राहणाऱ्या एका दांपत्याला कोरोनाची लागण झाली. त्यांचं एक सहा महिन्यांचं बाळही होतं. परंतु त्या बाळाची काळजी घेणारं कोणीही नव्हतं. अशा परिस्थितीत एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं पुढाकार घेत त्या बाळाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत राहणाऱ्या या दांपत्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला होता. परंतु त्या बाळाचा अहवाला नकारात्मक आला. इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार त्यांनी यानंतर दिल्ली पोलिसांना फोन केला आणि मदती करण्याची विनंती केली. दिल्लीत सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आपले नातेवाईक येऊ शकत नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यांना आपल्या बाळाला कोरोनाची लागण होऊ नये याची चिंता होती. 

शाहदरा जिल्ह्यात तैनात असलेलय्या महिला हेड कॉन्स्टेबल राखी यांना याबाबत माहिती मिळाली. यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी त्या दांपत्याशी संपर्क केला आणि बाळाला आपल्यासोबत घेऊन आल्या. पोलीस कर्मचारी राखी यांनी बाळाचे कपडे, खाणं आणि अन्य आवश्यक वस्तू आपल्यासोबत घेतल्या. तसंच त्यांनी त्या बाळाची काळजीही घेतली. त्यांनी त्या बाळाला अगदी आईप्रमाणे खाऊ-पिऊही दिलं. त्यानंतर त्या बाळाला सुरक्षितपणे आजीआजोबांकडे मोदीनगर या ठिकाणी पोहोचवलं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगाल