रस्त्यावरच लागलं लग्न, वरमाला घालताना दोघांचीही चढाओढ, व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 19:03 IST2021-08-01T19:00:17+5:302021-08-01T19:03:02+5:30
सध्या आपल्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. आपल लग्न प्रसिद्ध करण्यासाठी चित्रविचित्र पद्धतीनं लग्न करणारी जोडपी तुम्ही पाहिली असतील. पण सध्या आपल्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यासाठी धडपडणारी मंडळी आहेत.

रस्त्यावरच लागलं लग्न, वरमाला घालताना दोघांचीही चढाओढ, व्हिडिओ व्हायरल...
सध्या आपल्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. आपल लग्न प्रसिद्ध करण्यासाठी चित्रविचित्र पद्धतीनं लग्न करणारी जोडपी तुम्ही पाहिली असतील. पण सध्या आपल्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यासाठी धडपडणारी मंडळी आहेत.
लोक आकाशात उडत लग्न करतात, कुणी डोंगरावर लग्न करत तर कुणी आणखी कुठे. एका जोडप्याने आता भर रस्त्यात लग्न केलंय. सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर नवरदेव आणि नवरीचा हा व्हिडिओ (Bride and Groom Video) व्हायरल होत आहे. हे दोघंही रस्त्यावरच एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहेत. आणखी एक मजेशीर बाब म्हणजे हे दोघंही आपल्या खुर्च्यांवर बसलेले आहेत, मात्र या खुर्च्या जमिनीवर नाही. तर, नातेवाईकांनी आणि मित्रांनी या खुर्च्या वरती उचलून घेतल्या आहेत, जेणेकरून नवरी आणि नवरदेव सहजरित्या एकमेकांना वरमाला घालू शकणार नाहीत.
निरंजन महापात्रानं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरीदेव हसत आणि मस्ती करत एकमेकांना वरमाला घालत असल्याचं दिसतं. त्यांची ही मस्ती पाहून तिथे उपस्थित लोकंही हसू लागतात. आसपासच्या घरांमधील लोकही बालकनीमधून हा कार्यक्रम पाहताना दिसतात. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ ७ हजारहून अधिकांनी पाहिला आहे.