शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: लग्नाचं रिसेप्शन बनलं कुस्तीचा आखाडा, झाली फ्री स्टाईल हाणामारी, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 17:20 IST

एक व्यक्ती वधू आणि वराच्या (Bride and Groom) मध्ये जाऊन उभा राहिला. इतक्यात मागून कुणीतरी त्याची मस्करी केली आणि यामुळे तो भलताच भडकला. यानंतर लग्नाचं स्टेज थेट कुस्तीच्या आखाड्यात बदललं.

लग्नाच्या दिवशी काही अनुचित प्रकार घडला तर वातावरण थोडं तणावाचं होतं. यानंतर ही घटना लोकांना आयुष्यभर आठवते. आणखी एक गोष्ट म्हणजे लग्नाच्या स्टेजवर (Wedding Stage) घडलेली घटना तर कॅमेऱ्यातही कैद होते. सध्या लग्नाच्या स्टेजवर घडलेली अशीच एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली, याचा व्हिडिओही आता समोर आला आहे. यात दिसतं की एक व्यक्ती वधू आणि वराच्या (Bride and Groom) मध्ये जाऊन उभा राहिला. इतक्यात मागून कुणीतरी त्याची मस्करी केली आणि यामुळे तो भलताच भडकला. यानंतर लग्नाचं स्टेज थेट कुस्तीच्या आखाड्यात बदललं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Wedding Video) वरमाळा समारंभ संपल्यानंतर वधू-वर स्टेजवर उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती तिथे येऊन मध्येच उभी राहाते. कॅमेरामन फोटो काढण्यासाठी समोर बघायला सांगतो. यादरम्यान मागून कोणीतरी येऊन त्या व्यक्तीची मस्करी केली. काही सेकंद या व्यक्तीच्या काहीच लक्षात आलं नाही, पण नंतर आपली कोणीतरी मस्करी केल्याचं लक्षात येताच, तो भलताच भडकला.

एक सेकंदाचाही वेळ न घालवता तो रागाने मागे वळून पाहतो आणि मग त्या व्यक्तीला मारायला लागतो. मात्र या घटनेचा व्हिडिओ समोर रेकॉर्ड होत असल्याचं त्याच्या लक्षात आलं नाही. आपली मस्करी केल्यानं तो इतका भडकला होता, की त्याने मस्करी करणाऱ्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर only._.sarcasm_ नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने यावर कमेंट करत लिहिलं, 'अरे इतका राग.'

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न