लग्नातच नवऱ्याने सुरुवात केली लॅॅपटॉपवर वर्क फ्रॉम होमला, नवरीने दिली अशी काही रिअॅक्शन की मंडळी म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 14:57 IST2021-07-25T14:53:42+5:302021-07-25T14:57:24+5:30
लग्न लागलंय, वऱ्हाडी सज्ज आहेत, गुरुजी मंत्र बोलत आहेत आणि हा पठ्ठ्या लॅपटॉपवर काम करतोय....

लग्नातच नवऱ्याने सुरुवात केली लॅॅपटॉपवर वर्क फ्रॉम होमला, नवरीने दिली अशी काही रिअॅक्शन की मंडळी म्हणाली...
समजा तुमचा होणारा नवरा वर्कोहॉर्लिक असेल तर तुम्हाला किती टेन्शन येईल. दिवसरात्र फक्त काम, काम आणि काम यात गुंतलेला तो असेल. अशावेळी तो तुम्हाला कमी वेळ देईल आणि रोमॅन्सचा फार चुराडा होईल अशीच भीती तुम्हाला वाटेल ना? पण एक नवरी चक्क यावर हसतेय. होय तिला तिच्या वर्कोहॉर्लिक नवऱ्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही. उलट त्याचा वर्कोहॉर्लिकपणा पाहुन ती खो खो हसतेय.
वर्क फ्रॉम होम ने अनेकांचे वेळापत्रक बिघडवले. सुट्टीलाही सुट्टी दिली. पण आता या वर्क फ्रॉम होममुळे एका नवऱ्याला लग्नामध्येच लॅपटॉपवर काम करावं लागतंय. लग्न लागलंय, वऱ्हाडी सज्ज आहेत, गुरुजी मंत्र बोलत आहेत आणि हा पठ्ठ्या लॅपटॉपवर काम करतोय. त्याच्यावरून कॅमेरा थेट मुलीकडे नेल्यावर ती पोट धरुन हसतेय. बहुधा लग्नानंतर हे हसणं तिला चांगलंच महागात पडणाराय. बघुया तरी तेव्हा ती तिच्या पतीदेवांची काय खातिरदारी करते?
इन्स्टाग्रामवर दुल्हनिया नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तो काही क्षणांतच व्हायरल झाला. त्यावर लोकांच्याही मजेशीर कमेंट्स येत आहेत. कोणी म्हणतंय नवऱ्याला लग्नाचा खर्चही करायचा आहे, तर कुणी म्हणतंय याचा मॅनेजरचा घटस्फोट झाला पाहिजे आणि त्याची नोकरी गेली पाहिजे.