शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'नो पनीर नो शादी?' जेवणात पनीर नसल्याने भर मंडपात वऱ्हाड्यांमध्ये हाणामारी; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 14:11 IST

लग्नाच्या जेवणात पनीर नसल्याने लग्नाला आलेल्या पाहुण्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Viral Video: आता सगळीकडेच लग्न सराई सुरू झाली आहे. भारतात लग्न म्हटलं तर फार धूमधडाक्यात साजरं केलं जातं. मानपान तसेच प्रत्येकाच्या आवडीनिवडीकडे यजमानांना आवर्जून लक्ष द्यावे लागते. बऱ्याचदा लग्नात घरातील मोठी माणसे, नातेवाईकांमध्ये काहीजण रुसल्याच्या चर्चा कानावर येत असतात.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये वऱ्हाड्यांची नाराजी स्पष्ट दिसत आहे. हल्ली लग्नसमारंभात मानपान तसेच प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींची निवड ठरवून केली जाते. जेवणात गोडाचे कोणते पदार्थ असावेत, त्याव्यतिरिक्त वर-वधूचे कपड्यांपासून प्रत्येक गोष्टीचे पुरेपूर मॅनेजमेंट केले जाते.

अशातच एका लग्नसमारंभात जेवणामध्ये पनीरची भाजी नसल्याने पाहुणे मंडळींनी राडाच केला. या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये लग्नासमारंभात नवरा-नवरी या दोन्हीकडील मंडळी जेवणासाठी जमली आहेत. जेवणाची पंगत बसली असताना त्यातील काही मंडळींनी त्यांच्या ताटात पनीरची भाजी नाही म्हणून वाडप्यांना विचारणा केली. पनीरवरून रंगलेला हा वाद अधिक तीव्र होत गेला. 

बाचाबाचीनवरून या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे वर-वधूच्या दोन्ही बाजच्या मंडळींनी एकमेकांवर पाणी उपसायला सुरूवात केली. हा वाद इतका चिघळला की लग्नातील वऱ्हाड्यांनी चक्क खुर्च्या तोडल्या तर काहींनी मंडपाचे पडदे फाडले. सध्या या खतरनाक राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने 'नो पनीर नो शादी' अशी मजेशीर कमेंट केलीये. तर आणखी एकाने 'पनीर का चक्कर बाबू भय्या' असं म्हटलयं.

येथे पाहा व्हिडीओ :

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर