"मोदी महान आहेत, ते आमचे PM हवे होते", कंगाल पाकिस्तानातील तरुणाची भावूक अपील, पाहा व्हायरल Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 15:41 IST2023-02-23T15:40:08+5:302023-02-23T15:41:32+5:30
आम्हाला नवाज नको, इमरान नको...आम्हाला फक्त मोदी पाहिजेत. जे आमच्या देशाला सरळ करू शकतील आणि रुळावर आणतील, हे शब्द आहेत पाकिस्तानातील तरुणाचे.

"मोदी महान आहेत, ते आमचे PM हवे होते", कंगाल पाकिस्तानातील तरुणाची भावूक अपील, पाहा व्हायरल Video
आम्हाला नवाज नको, इमरान नको...आम्हाला फक्त मोदी पाहिजेत. जे आमच्या देशाला सरळ करू शकतील आणि रुळावर आणतील, हे शब्द आहेत पाकिस्तानातील तरुणाचे. सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात पाकिस्तानातील एक तरुण पाकिस्तानला आर्थिक संकटातून जर कुणी वाचवू शकतं तर ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असं म्हटलं आहे. पाक युवक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रशासनाचं कौतुक या व्हिडिओमध्ये करत आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावर तो जोरदार टीका करत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला यू्ट्यूबर पाकिस्तानातील एका तरुणाला देशातील आर्थिक संकटाबाबत प्रश्न विचारताना दिसते. पाकिस्तानात जर मोदी सरकार असतं आज दैनंदिन गरजेच्या वस्तू इतक्या महाग मिळाल्या नसत्या, अशी भावना तरुणानं व्यक्त केली आहे. "पाकिस्तानातून पळून जा हवंतर भारतात जा, अशी घोषणाबाजी का केली जात आहे?", असं यूट्यूबर महिला विचारते. त्यावर पाकिस्तानातील तरुण म्हणतो की,"दोन्ही देश वेगळे झाले नसते तर खूप बरं झालं असतं. तर आम्हालाही आज २० रुपये किलोनं टोमॅटो, १५० रुपयात चिकन आणि १५० रुपयात पेट्रोल खरेदी करता आलं असतं. आम्हाला नवाज-इमरान नकोत. आम्हाला मोदी हवेत. मोदी महान आहेत. त्यांचं सरकार इथं असायला हवं होतं"
पाकिस्तान की अवाम माँगे #मोदी… pic.twitter.com/RkoTsa9gZS
— Nil hindu 3693 (@nilhindu07) February 23, 2023
पाकिस्तानी व्यक्ती अल्लाहकडे प्रार्थना करतो की पाकिस्तानला मोदी मिळावेत आणि त्यांनी आपल्या देशावर राज्य करावे. पाकिस्तानी यूट्यूबर सना अमजदने तीन दिवसांपूर्वी हा व्हिडिओ तिच्या चॅनलवर शेअर केला होता, जो प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाख ७६ हजार वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.