Video : पंजाबमधील या आजोबांची कबड्डी तरुणांनाही लाजवेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 17:04 IST2018-10-08T17:01:29+5:302018-10-08T17:04:12+5:30
कबड्डी हा खेळ तसा सर्वांच्याच आवडीचा...अनेक तरुणांना तुम्ही हा रांगडा खेळ खेळताना पाहिले असेल. त्यांचा रोमांचक खेळ पाहून तुम्ही उत्साहीत झाले असाल.

Video : पंजाबमधील या आजोबांची कबड्डी तरुणांनाही लाजवेल!
कबड्डी हा खेळ तसा सर्वांच्याच आवडीचा...अनेक तरुणांना तुम्ही हा रांगडा खेळ खेळताना पाहिले असेल. त्यांचा रोमांचक खेळ पाहून तुम्ही उत्साहीत झाले असाल. पण सध्या पंजाबमधील काही वयोवृद्धांचा कबड्डी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. त्यांचा हा खेळ पाहून तुम्ही चक्क पाणी मागाल.
या व्हिडीओमध्ये आपण बघू शकतो की, एक ५० पेक्षा अधिक वय असलेला व्यक्ती सामान्यात सर्वांच्या नाकी नऊ आणत आहे. तोच या सामन्याचं आकर्षण ठरत आहे. पण तुम्ही नेहमी जशी कबड्डी पाहता तशी ही नसून यात जरा फरक आहे. यात खेळाडू एकमेकांना मारताना दिसत आहे.
असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक सडपातळ व्यक्तीही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्यक्तीचं नाव जगीर भुल्लर असून दिसायला ते फारच कमजोर वाटतात पण कबड्डीमध्ये त्यांना फेविकॉलच्या नावाने ओळखले जाते. याचं कारण एकदा जर त्यांनी कुणाला पकडलं तर त्याला ते सोडतच नाहीत.