Dog stuck in drainage pipe : अरेरे! ड्रेनेज पाईपमध्ये अडकला होता दृष्टीहीन कुत्रा; बचाव पथकाच्या जवानांनी 'असे' वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 13:23 IST2021-03-24T13:14:42+5:302021-03-24T13:23:25+5:30

Visually impaired Dog stuck in drainage pipe : बचाव पथकाला कुत्र्याच्या मालकाचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की कुत्रा ड्रेनेज पाईपमध्ये अडकला आहे.

Visually impaired dog stuck in drainage pipe fire fighters pulled out like this see photos | Dog stuck in drainage pipe : अरेरे! ड्रेनेज पाईपमध्ये अडकला होता दृष्टीहीन कुत्रा; बचाव पथकाच्या जवानांनी 'असे' वाचवले प्राण

Dog stuck in drainage pipe : अरेरे! ड्रेनेज पाईपमध्ये अडकला होता दृष्टीहीन कुत्रा; बचाव पथकाच्या जवानांनी 'असे' वाचवले प्राण

सोशल मीडियावर  प्राण्याचे वेगवेगळे फोटोज व्हायरल होत असतात. फ्लोरिडातील एक दृष्टीहीन  (visually impaired and deaf dog) कुत्रा जो ऐकूही शकत नव्हता. तो कुत्रा ड्रेनेज पाईपमध्ये (drainage pipe)  अडकला. याची सुचना मिळताच त्याठिकाणी उपस्थित बचाव पथकांच्या जवानांनी २ तासांची मेहनत करून या कुत्र्याला बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचवला. फ्लोरिडाच्या सेंट जॉन काउंटी फायर रेस्क्यूने (firefighters)  आपल्या फेसबुक पेजवर ही माहिती दिली आहे. येथे त्यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. फोटोंमध्ये आपण हे पाहू शकता की कुत्रा ड्रेनेज पाईपच्या  आत खोल जाऊन कसा अडकला आहे.  जवान कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी कसा प्रयत्न करीत आहेत.

फेसबुक पेजवर देण्यात आलेल्या माहितीनुसार बचाव पथकाला कुत्र्याच्या मालकाचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की कुत्रा ड्रेनेज पाईपमध्ये अडकला आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, "इंजिन 14, पथक 4, आणि यूएसएआर 4 घटनास्थळी आले आणि त्यांना समजले की कुत्रा ड्रेनेज पाईपच्या मध्यभागी अडकला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी या पथकाने सुमारे दोन तास काम केले. कुत्रा खूप घाबरलेला आणि कंटाळलेला होता. सुदैवानं कोणतीही जखम या मुक्या जीवाला झाली नव्हती. कुटुंबियांना परत मिळाल्यामुळे सध्या हा कुत्रा आनंदात आहे. 

सोशल मीडियावरील लोक अग्निशामक जवानांच्या या कार्याचे जोरदार कौतुक करीत आहेत. एका  सोशल मीडिया युजरनं लिहिले, की, "ग्रेट जॉब आणि मला खात्री आहे की त्यामधून तुम्हाला चांगले प्रशिक्षण मिळाले." दुसरा म्हणाला, "मी तुमची टीम नुकतीच बदक वाचवताना पाहिलेली आहे. आता तुम्ही कुत्र्यांना वाचवत आहात. येथून प्रत्येकजण तुमच्या सेवेबद्दल तुमचे आभारी आहे." सावधान! जास्तवेळ बसून काम केल्यानं कमी वयातच होऊ शकतो कमरेचा आजार; या उपायांनी  मिळवा आराम

त्यांच्या प्रयत्नांसाठी संघाचे आभार मानताना एका युजरनं  सांगितले, "मला आनंद झाला आहे की तुमच्या प्रयत्नांमुळे या कुत्र्याला नवीन जीवन मिळाले! धन्यवाद! मी सांगत आहे की या टीमने नुकतीच नाल्यामधून एक बदकं वाचवलं आणि त्याची आई, भावंडांसह भेट घडवली. '' बापरे! मासिक पाळीदरम्यान तरूणीच्या डोळ्यातून आले रक्ताचे अश्रू; समोर आला 'हा' दुर्मिळ आजार   

Web Title: Visually impaired dog stuck in drainage pipe fire fighters pulled out like this see photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.