VIDEO: वाघाला पळवून लावण्यासाठी गावकरी काठी घेऊन मागे धावले अन् मग जे घडलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:31 IST2025-03-21T18:31:39+5:302025-03-21T18:31:57+5:30
Tiger Viral Video: भरदिवसा जंगलातून वाघ चुकून शेतात आला

VIDEO: वाघाला पळवून लावण्यासाठी गावकरी काठी घेऊन मागे धावले अन् मग जे घडलं...
Tiger Viral Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक वाघ जंगलातून अचानक शेतात शिरला आहे. पण त्यानंतर तिथे जे काही घडते ते आणखी आश्चर्यकारक आहे. गावातील काही लोक वाघाला हाकलण्यासाठी चक्क काठ्या घेऊन त्याच्या मागे धावतात. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वाघ पुढे धावताना दिसत आहे, तर काही लोक काठ्या घेऊन त्याच्या मागे धावत आहेत.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @wildtrails.in नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जंगलाच्या सीमेवरील एका शेतात एक वाघ घुसला आणि गावकऱ्यांनी त्याला काठ्यांनी हाकलून लावले. पाहा व्हायरल व्हिडीओ-
दरम्यान, हा व्हिडिओ कुठला आहे याबद्दल पुष्टी झालेली नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वाघ शेताच्या मध्यभागी एका झाडाजवळ उभा असल्याचे दिसते. मग गावकरी त्याला पाहून मोठमोठ्याने ओरडू लागतात. त्यानंतर त्याच व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की, वाघ तिथून निघून जाताच लोक मागे काठ्या घेऊन येतात. तसेच, काही लोक मोबाईलने या घटनेचे शूटिंगदेखील करताना दिसतात.