शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 22:25 IST

एका कारच्या मागील काचेवर एक डिजिटल बोर्ड लावण्यात आला आहे, ज्यावर अशी काही सूचना लिहून येत आहे की, ती वाचून लोकांनी खूप मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सध्या बाजारात गाड्यांसाठी नवनवीन ॲक्सेसरीज येत आहेत, ज्यांचा वापर लोक इतक्या हटके पद्धतीने करत आहेत की, इंटरनेटवर त्यांचे व्हिडीओ पाहून सारेच थक्क होत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीने आपल्या गाडीच्या मागच्या बाजूला 'इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले पॅनल' लावून एक अत्यंत अनोखी सूचना लिहिली आहे, जी वाचून अनेकांना हसू आवरता येत नाहीये.

आपल्याला माहीत आहे, गाडीला थोडा जरी धक्का लागला किंवा ती घासली गेली, तरी रस्त्यावर लगेच महाभारत सुरू होते. लोकांचे वाद इतके वाढतात की, रागाच्या भरात ते एकमेकांवर बंदूकही रोखायला मागेपुढे पाहत नाहीत. 'रोड रेज'चे असे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण यावेळी जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो थोडा वेगळा आहे.

या व्हायरल क्लिपमध्ये रोड रेज नाही, तर एका नवऱ्याने केलेली अनोखी विनंती आहे. एका कारच्या मागील काचेवर एक डिजिटल बोर्ड लावण्यात आला आहे, ज्यावर अशी काही सूचना लिहून येत आहे की, ती वाचून कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी खूप मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

डिस्प्लेवरील 'ती' खास चेतावणी!या व्हायरल व्हिडीओमध्ये, ट्रॅफिकमध्ये उभ्या असलेल्या या कारच्या चालकाने मागील काचेवर 'इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले पॅनल' लावले आहे, ज्यावर सर्वात आधी, "कृपया अंतर ठेवा... अंतर ठेवा" असे लिहून येते. आणि त्यानंतर पुढे, "कारला धक्का लागला तर बायको मला मारेल!" असे लिहून येते. या वाक्याच्या शेवटी डोळ्यातून अश्रू वाहत असल्याची इमोजी देखील वापरली गेली आहे, ज्यामुळे नवऱ्याची ही अनोखी विनंती अधिकच बोलकी वाटते.

व्हिडीओ व्हायरल, लाखो व्ह्यूज!हा व्हिडीओ इन्स्टाग्राम हँडल 'trippi_twenty'ने शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "या भावाला आज मार खावा लागला आहे वाटतं". या पोस्टला ३ लाखांहून अधिक लाईक्स आणि ९० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर दीड हजारांहून अधिक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत.

एका युजरने लिहिले, "भय इथले संपत नाही, पण हे पण चांगले आहे." तर दुसऱ्याने लिहिले, "ब्लू ड्रम तयार आहे वाटतं." तिसऱ्या युजरने "नंबर प्लेट तर कमाल आहे!" अशी प्रतिक्रिया दिली. तर काही युजर्सनी तर "काय भाऊ... हुंड्याची कार आहे का?" असेही मजेशीर प्रश्न विचारले आहेत.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल