Labubu Viral Video : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लाबुबू या बाहुलीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या बाहुलीला कुणी अपशकुनी म्हणत आहे, तर कुणी तिचे वेगवेगळे किस्से सांगत आहे. दिसायला ही बाहुली थोडीशी विचित्र वाटत असली, तरी तिला जगभरातून खूप प्रेम मिळाले. मात्र, सध्या सोशल मीडियावर लाबुबू जाळण्याचा ट्रेंड सुरू आहे. यातच आता एक महिला चक्क याच सैतानी म्हणवल्या जाणाऱ्या बाहुलीची पूजा करताना दिसली आहे. याच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
काय आहे 'या' व्हिडीओमध्ये?या व्हिडीओमध्ये एक महिला हातात लाबुबू डॉल घेऊन बेडवर बसली आहे. तिच्याच घरातील एक मुलगी तिच्या जवळ जाऊन विचारते की, 'हे काय आहे?' यावर उत्तर देताना ती महिला म्हणते की, 'ही चीनची देवता आहे.' यानंतर ती हातातील लाबुबू डॉल आपल्या घरातील देवघराजवळ घेऊन जाते आणि तिची पूजा करू लागते. तर, तिच्या बाजूला बसलेला व्यक्ती या बाहुलीच्या पायांना स्पर्श करून तिचा आशीर्वाद घेताना दिसतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर 'TyrantOppressor' या आयडीने शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'एका भारतीय मुलीने तिच्या आईला सांगितले की, लाबुबू ही एक चिनी देवता आहे. हे ऐकताच तिने लाबुबूची पूजा करायला सुरुवात केली. जय लाबुबू'. अवघ्या २५ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत ९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि हजारो लोकांनी व्हिडीओला लाईक देखील केले आहे.
लाबुबू डॉलच्या पूजेचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता नेटकरी देखील त्यावर व्यक्त होत आहेत. काही जण या व्हिडीओमधील महिलेचा हा निष्पापपणा असल्याचे महान्त आहेत, तर काही लोक यावर टीका देखील करत आहेत.