Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 18:37 IST2025-06-08T18:34:39+5:302025-06-08T18:37:58+5:30

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, जो बघून नेटकरी अक्षरशः हसून हसून लोटपोट झाले आहेत.

Viral Video: Went to steal and slipped! Thief's mishap caught on CCTV | Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद

Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद

चोरी करायला येणारे चोर अनेकदा सीसीटीव्हीमध्ये कैद होतात. अशा फुटेजमध्ये आपल्याला चोरांचेही अनेक प्रकार पाहायला मिळतात. काही चोर अगदी योजनाबद्ध असतात, तर काही अतिशय धिट तर काही अगदी हौशी चोर असल्यासारखे असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, जो बघून नेटकरी अक्षरशः हसून हसून लोटपोट झाले आहेत. या व्हिडीओत एक चोर चोरी करण्यासाठी येतो, पण त्याच्या लोभामुळे त्याचीच चांगली फजिती होते. 

काय आहे नेमकं व्हिडीओत?

ही घटना उत्तराखंडमधील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये दिसतं की, एक तरुण चोर रात्रीच्या वेळी घराच्या अंगणात प्रवेश करतो. घराचं थोडं निरीक्षण केल्यावर त्याला बाहेर ठेवलेला गॅस सिलेंडर दिसतो. बहुतेक त्याला वाटलं असावं की हा सिलेंडर विकून काही पैसे मिळतील, म्हणून लगेच तो खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न करतो.

पण जसं तो सिलेंडर उचलून बाहेर गेटकडे निघतो, तसंच त्याचं संतुलन बिघडतं आणि सिलेंडरच्या वजनामुळे तो थेट समोर असलेल्या नाल्यात कोसळतो! ही घटना घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडीओ एक्स या प्लॅटफॉर्मवर 'askbhupi' या युजरने पोस्ट केला आहे. पोस्ट झाल्यानंतर काही तासांतच हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आणि यावर मजेशीर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली.

एका युजरने लिहिलं की, “चोरी करायची तर ताकद तरी ठेवावी, एवढा जड सिलेंडर उचलताना विचार तरी केला असतास!”
तर दुसऱ्याने चोराची खिल्ली उडवत लिहिलं की,“चोरीचा विचार जड झाला... पण सिलेंडर जड वाटला नाही का?" आणखी एका वापरकर्त्याने तर थेट सिनेमातील डायलॉग वापरून लिहिलं की, “लोभ मोठा ना भावा, पण नाला त्यापेक्षा अजून मोठा!”

या चोराने सहजपणे चोरी करण्याचा विचार केला खरा, पण प्रत्यक्षात परिस्थितीने त्याला चांगलाच धडा शिकवला.

Web Title: Viral Video: Went to steal and slipped! Thief's mishap caught on CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.