Viral Video: हरियाणवी गायकाच्या लाईव्ह शोमध्ये मुलींचा 'भलताच' कार्यक्रम, व्हिडीओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:13 IST2025-11-07T18:11:12+5:302025-11-07T18:13:10+5:30
Viral News: हरियाणवी गायक गुलजार छानीवाला यांच्या लाईव्ह शोमध्ये पाठीमागे थांबलेल्या मुलींचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Viral Video: हरियाणवी गायकाच्या लाईव्ह शोमध्ये मुलींचा 'भलताच' कार्यक्रम, व्हिडीओ व्हायरल!
उत्तर प्रदेशात मंगळवारी रात्री ड्रॅमंड गव्हर्नमेंट इंटर कॉलेजमध्ये एका खाजगी संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भलत्याच गोष्टी घडल्या. हरियाणवी गायक गुलजार छानीवाला यांच्या लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान मुलींच्या दोन गटात फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर २०२५ रात्री १०:३० वाजताच्या सुमारास मेळ्यातील मुलींच्या दोन गटांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर लगेचच शारीरिक हाणामारीत झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुलींचे दोन गट एकमेकांना मारहाण करताना, केस ओढताना स्पष्टपणे दिसत आहेत. गोंधळामुळे पाहुणे हस्तक्षेप करण्यास कचरत होते.
पीलीभीत
— India News UP/UK (@IndiaNewsUP_UK) November 6, 2025
ड्रमंड राजकीय इंटर कॉलेज में हरियाणवी सिंगर गुलजार छानीवाला के शो के दौरान लड़कों के दो गुटों में मारपीट।
अब लड़कियों के गुटों में भी मारपीट का वीडियो सोशल मीडिया पर वायरल।
घटना से कॉलेज परिसर में हड़कंप और तनाव का माहौल।#Pilibhit#CollegeFight#ViralVideo#UPPolice… pic.twitter.com/hw4i9Ny6gq
पोलिसांच्या मध्यस्तीनंतर वाद मिटला
अमर उजालाच्या वृत्तानुसार, माहिती मिळताच कोतवाली पोलिस आणि शहर मंडळ अधिकारी दीपक चतुर्वेदी अतिरिक्त बळासह घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही गटांना शांत केले. वारंवार होणाऱ्या अशा हाणामारीमुळे संपूर्ण कार्यक्रमात घबराट निर्माण झाली.
व्हिडिओची पडताळणी सुरू
पोलिसांनी सांगितले की, मुलींच्या दोन्ही गटांमध्ये आधीपासूनच तणाव होता आणि त्या मेळ्यात समोरासमोर आल्यामुळे हाणामारी झाली. "दोन्ही बाजूंना शांत करण्यात आले आहे आणि जर तक्रार दाखल झाली तर योग्य ती कारवाई केली जाईल", असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी घटनेशी संबंधित व्हायरल व्हिडिओची पडताळणी देखील सुरू केली आहे.