Viral Video: वाऱ्याच्या वेगाने पळवत होता बाईक, पोलीस करत होते पाठलाग; पुढं भयंकर घडलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:17 IST2025-10-29T14:15:52+5:302025-10-29T14:17:05+5:30
Viral News: कॅलिफोर्नियातील थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

Viral Video: वाऱ्याच्या वेगाने पळवत होता बाईक, पोलीस करत होते पाठलाग; पुढं भयंकर घडलं!
कॅलिफोर्नियातील सॅन बर्नार्डिनो काउंटी शेरीफ विभागाचे डेप्युटी अँड्र्यू नुनेज यांच्या हत्येचा संशयित आरोपी पळून जात असताना भीषण अपघातात गंभीर जखमी झाला. पोलीस पाठलाग करत असताना आरोपी जवळपास २५० च्या वेगाने बाईक पळवत होता. परंतु, या पाठलागाचा शेवट एका अपघाताने झाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नुनेज यांना एका सशस्त्र व्यक्तीने महिलेला धमकावल्याची तक्रार मिळाली. नुनेज घटनास्थळी पोहोचताच संशयिताने त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात नुनेज यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने कोल्टनमधील अॅरोहेड रीजनल मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
डेप्युटी नुनेज यांच्या हत्येनंतर, अधिकाऱ्यांनी मारेकऱ्याचा शोध सुरू केला. संशयित आरोपी मोटारसायकलवरून २१० फ्रीवेवर १२० मैल प्रतितास (जवळपास १९३ किमी/तास) पेक्षा जास्त वेगाने पळून जात होता. अखेरीस, क्लेअरमोंटजवळ संशयिताच्या समोर अचानक एक काळी कार आली आणि तिने वेग कमी केला. त्यामुळे संशयित मोटारसायकलवरून फेकला गेला. अंदाजे ७० मैल प्रतितास वेगाने (जवळपास ११२ किमी/तास) तो जमिनीवर पडला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या आरोपीला तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात नेण्यात आले असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
WATCH: A suspect accused of fatally shooting a California deputy leads officers on a harrowing 150-mph freeway chase before crashing his motorcycle into a moving car and being taken into custody. pic.twitter.com/2VppJk9mDW
— Fox News (@FoxNews) October 28, 2025
व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या थरारक पाठलागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अपघाताच्या वेळी, बाईकरच्या समोर आलेल्या कारने अचानक वेग कमी केल्यामुळेच अपघात झाला. यावर लोक जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने म्हटले आहे की, "कार चालकाने पोलिसांचे काम सोपे केले." दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, कार चालकाने जाणूनबुजून त्याचा वेग कमी केला."