Small Girl Dance viral video: सोशल मीडियावर विविध गोष्टी झपाट्याने व्हायरल होत असतात. इंटरनेटवर डान्स व्हिडिओ अधिक पसंत केल्या जातात. दररोज एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतो, जो लोकांचे लक्ष वेधून घेतो. कारण सोशल मीडिया हे एक असे माध्यम बनले आहे जिथे सर्व वयोगटातील लोकांचे तोंडभरून कौतुक केले जाते. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये एक चिमुरडी तिच्या नृत्याने साऱ्यांचे मन जिंकताना दिसते आहे.
"मेरा दिवानापन" या पंजाबी गाण्यावर आधारित एक डान्स ही चिमुरडी करताना दिसते. या व्हिडिओमध्ये लहान मुलीचा आत्मविश्वास आणि डान्सची लय पाहून सारेच थक्क होतात. व्हिडिओमध्ये ती मुलगी हरियाणवी पोशाख घालून आनंदाने नाचताना दिसत आहे. ती पिवळ्या रंगाचा फ्रॉक आणि डेनिम जॅकेट घातलेली दिसते आहे. तिच्या चेहऱ्यावर छान उत्साह दिसत आहे. गाणे सुरू होताच ती मुलगी पूर्ण आत्मविश्वासाने नाचू लागते. तिच्या प्रत्येक डान्स स्टेप्सने ती मनं जिंकताना दिसते. ही क्लिप सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ-
या चिमुरडीचा डान्स पाहून अनेक जण त्यांच्या मोबाईल फोनवर व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसतात. सोशल मीडियावर लोक या मुलीला "लिटल स्टार" म्हणले जात आहे. हा व्हिडिओची विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. कोट्यवधी लोकांनी तिचे कौतुक केले आहे तसेच व्हिडीओला लाईक देखील केले आहे.