Video: विषारी सापांच्या भीतीमुळे लोकांनी काठ्यांवर चालायला केली सुरुवात, पाहा अजब पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:34 IST2025-02-26T15:34:03+5:302025-02-26T15:34:47+5:30

people walking on sticks viral video: सोशल मीडियावर केव्हा काय व्हायरल होईल याची कल्पना येणं शक्यच नाही

viral video on social media people of Banna Tribe in Ethiopia protects themselves from poisonous snakes watch | Video: विषारी सापांच्या भीतीमुळे लोकांनी काठ्यांवर चालायला केली सुरुवात, पाहा अजब पद्धत

Video: विषारी सापांच्या भीतीमुळे लोकांनी काठ्यांवर चालायला केली सुरुवात, पाहा अजब पद्धत

people walking on sticks viral video: सोशल मीडियावर केव्हा काय व्हायरल होईल याची कल्पना येणं शक्यच नाही. काही वेळा एखादा छोटासा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरतो तर काहीवेळा एखादा वादाचा व्हिडीओ लोकांच्या चर्चेचा विषय ठरतो. नुकताच इथिओपियातील बन्ना जमातीच्या लोकांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. हे लोक विषारी सापांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लांब लाकडी खांबाचा म्हणजेच स्टिल्टचा वापर करताना दिसतात. याच्याशी संबंधित व्हिडिओ सध्या लोकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. हे स्टिल्ट इतके उंच आहेत की साप त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि बन्ना लोक त्यांच्यावर सहजतेने चालण्यात निष्णात आहेत.

अजब गजब व्हिडीओ झालाय व्हायरल

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की मुले, वृद्ध माणसे आणि तरुण मंडळी सर्वच जण स्टिल्टवर आनंदाने चालत आहेत. हे पाहून, लोकांना आश्चर्य वाटते की इतक्या उंचीवर चालताना समतोल राखणे त्यांच्यासाठी इतके सोपे कसे काय आहे. तर यामागे सापांची भीती आहे. सर्पदंशाचा धोका टाळण्यासाठी या लोकांनी ही प्रभावी युक्ती शोधून काढली आहे. पाहा व्हिडीओ-

ट्विटरवर हा व्हिडीओ @Afrika_Stories नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी तो पाहिला आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक बन्ना जमातीच्या या अनोख्या युक्तीचे कौतुक करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, हा खूपच अद्भूत उपाय आहे. या उपायांनी सापांपासून नक्कीच संरक्षण होईल. तर दुसरा म्हणाला की, त्यांचा चालतानाचा तोल पाहून भीतीलाही लाज वाटेल. युजर्स सध्या या लोकांचे कौतुक करत आहेत.

Web Title: viral video on social media people of Banna Tribe in Ethiopia protects themselves from poisonous snakes watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.