शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

Holi Jugaad Viral Video: भन्नाट जुगाड! होळी खेळताना स्वत:कडचे रंग संपल्यावर मुलाने केला 'स्मार्ट' उपाय; भले भलेही होतील हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 17:56 IST

तुम्ही पाहिलात का व्हिडीओ?

आज देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. हा वर्षातील असा एक सण आहे, ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि रंगीत पाण्याने एकमेकांना भिजवून टाकतात. पण काही लोक असेही असतात जे या दिवशी खूप धमाल मस्ती करताना दिसतात. विशेषत: मुलांना धुळवडीच्या दिवशी काही ना काही मस्ती करावीशी वाटत असते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच तुमचे बालपणीचे दिवस आठवतील.

होळीच्या दिवशी लहान मुलं खूप धमाल करतात. पण जेव्हा मुलांकडचे रंग संपतात तेव्हा ते एकमेकांचे रंग हिसकावून घेतात. काही वेळा तर मुले रंग सोडून चिखलानेही होळी खेळतात. या संबंधीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगा इतरांवर चक्क नाल्यातलं पाणी उडवताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, काही मुले एका मुलावर रंग फेकत होते. त्यावेळी तो मुलगा संतापला. याचा बदला घेण्यासाठी तो नाल्याजवळ गेला आणि नाल्यातील पाणी पिचकारीत भरून घेतलं. त्यानंतर पिचकारीतील पाणी इतर मुलांवर उडवू लागला. मुलाचं असं कृत्य पाहिल्यानंतर सारेच चक्रावून गेले.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक हैराण झाले असून त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, 'मुलाने खरोखरंच बदला घेण्यासाठी खतरनाक जुगाड केला.' तर दुसर्‍या यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, 'ही खरोखरच नेक्स्ट लेव्हल होळी आहे.' याशिवाय आणखी एका यूजरने लिहिलं, 'हा व्हिडिओ पाहून मला माझे बालपणीचे दिवस आठवले.' या व्हिडीओवर आणखीही अनेक युजर्सने मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम