शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! ब्रिटनच्या पंतप्रधानांवर आली स्वतःच्याच घराबाहेर थांबण्याची वेळ; 'Video' होतोय व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 14:57 IST

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर स्वतःच्याच घराबाहेर उभे राहण्याची वेळ का बरं आली असेल? जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय... 

Viral Video : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. ऋषी सुनक यांना स्वतःच्याच घराबाहेर काही वेळ उभे राहावे लागले असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या रोखठोक भूमिका आणि विधानांमुळे चर्चेत असणारे ऋषी सुनक यांचा  नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटेंसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. सुनक हे मार्क रुटे यांचे स्वागत करताना त्यांच्या घराचा दरवाजा अचानक बंद झाला. बराच वेळ झाला तरी दरवाजा उघडला नाही. 

दरम्यान, नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांचे स्वागत करण्यासाठी ऋषी सुनक घराबाहेर (१० डाउनिंग स्ट्रीट) आल्यानंतर काही क्षणात घराचा दरवाचा बंद झाला. त्यामुळे ऋषी सुनक यांची तारांबळ उडाली. दरवाजा उघडण्यासाठी ऋषी सुनक यांनी केलेली खटपट मीडियाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्यासमोर हा संपूर्ण प्रकार घडला.

या व्हायरल व्हिडीओमध्ये ऋषी सुनक प्रचंड अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळते आहे. अचानक लॉक झालेल्या दरवाज्यामुळे सुनक आणि मार्क रुटे यांच्यावर घराबाहेर उभे राहण्याची वेळ आली. वारंवार घराचा दरवाजा ठोठावून सुद्धा कोणीही दाद देत नसल्याने दोन्ही नेत्यांचा गोंधळ उडून गेला. अखेरीस काही वेळानंतर सुनक यांच्या घरातील एका सुरक्षारक्षकाने हा दरवाजा उघडला. तांत्रिक अडचणींमुळे दरवाजा बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

येथे पाहा व्हिडीओ :

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाRishi Sunakऋषी सुनकTwitterट्विटर