शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मुंबईच्या रस्त्यावर रिक्षाचालकाच्या गाण्याची 'ट्रीट'; सुप्रसिद्ध संगीतकारालाही पडली भूरळ, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:20 IST

सध्या मुंबईतील एका रिक्षाचालकाच्या टॅलेंटची  सर्वत्र चर्चा होतेय,  व्हिडीओ होतोय व्हायरल...  

Auto Driver Viral Video: सोशल मीडियावर दिवसेंदिवस नानाविध प्रकारचे व्हिडीओ शेअर केले जातात.  सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कलागुणांना वाव देण्याचा प्रत्येकाचा कल असतो. अशाच एका रिक्षाचालकाने त्याच्या गायकीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मुंबईतील हा ऑटोड्रायव्हर सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. 

हल्ली मुंबईच्या रस्त्यावर एक रिक्षाचालक गाणं गाताना दिसत आहे. या सर्वसामान्य रिक्षाचालकाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. रिक्षामध्ये तो गाणं गातोय. सर्वसामान्य प्रवाशाला मिळणारी ही सुरांची अस्सल मेजवानी आहे. आपल्या कलेला जोपासण्याचे काम हा रिक्षाचालक करतोय. हा व्हिडीओ मुंबईतील वांद्रे येथील असल्याचे सांगितले जात आहे.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं 'खोया खोया चांद खुला आसमान' हे गाणं हा रिक्षाचालक गात आहे. त्याच्या सुरेल आवाजाने नेटकरी अवाक् झाले आहेत.  विशेष म्हणजे या रिक्षाचालकाच्या गायकीची दखल सुप्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदीने घेतलीय.  इतकंच नाही तर खुद्द अमित त्रिवेदीनेच या रिक्षाचालकाचा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अमित त्रिवेदीने या रिक्षाचालकाच्या गायनाचे कौतुक देखील केले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये हा रिक्षाचालक भरधाव वेगात मुंबईच्या रस्त्यांवर फिरतोय. रिक्षाला रंगीबेरंगी लाईटींग करत हातात माईक घेवून हा रिक्षाचालक मोहम्मद रफी यांच गाणं गाताना दिसतोय. 

या व्हिडीओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'खुप सुंदर टॅलेंट आहे', 'रिक्षा ड्रायव्हर खूप टॅलेंटेड आहे' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

येथे पाहा व्हिडीओ :

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम