संतापजनक! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारू, पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:18 IST2025-04-19T16:12:39+5:302025-04-19T16:18:10+5:30
विद्यार्थ्यांना दारू पाजणाऱ्या शिक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर शिक्षकाविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.

संतापजनक! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारू, पाहा व्हिडिओ
आई वडिलांनंतर मुलांना संस्कार देण्याचे आणि घडवण्याचे काम कोण करत असेल तर ते शिक्षक आहेत. परंतु, असे काही शिक्षक असतात, जे विद्यार्थ्यांना घडवण्याऐवजी बिघडवण्याचे काम करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एक शिक्षक विद्यार्थ्यांना दारूचा पॅग कसा बनवायचा हे शिकवून त्यांना दारु पाजताना दिसतोय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.हा प्रकार मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील आहे.
लाल नवीन प्रताप सिंह असे संबंधित शिक्षकाचे नाव असून तो बारवारा ब्लॉकमधील खिरहानी गावातील एका सरकारी प्राथमिक मुलांना शिकवतो. त्याच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, प्रताप सिंह मुलांना कपमध्ये दारू ओतून प्यायला देताना दिसत आहे. तो एका विद्यार्थ्याला दारू पिण्यापूर्वी त्यात पाणी मिसळण्यास सांगताना ऐकू येत आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'ज्ञानाच्या मंदिरात लाजिरवाणा प्रकार! मध्य प्रदेशातील कटनी येथे एका शिक्षकाने निष्पाप मुलांना देशी दारू पाजल्याचे घृणास्पद कृत्य उघडकीस आले आहे. ही घटना राज्याच्या शिक्षण व्यवस्थेच्या आणि भाजप सरकारच्या दुर्लक्षाचा थेट पुरावा आहे. भाजपच्या राजवटीत शिक्षक प्रतिष्ठा विसरली आहे आणि सरकार डोळे मिटून बसले आहे.'
शिक्षा का मंदिर शर्मसार!
— Manjeet Ghoshi (@ghoshi_manjeet) April 18, 2025
कटनी, मध्य प्रदेश में एक शिक्षक द्वारा मासूम बच्चों को देशी शराब पिलाने का घिनौना कृत्य सामने आया है।
यह घटना प्रदेश की शिक्षा व्यवस्था और भाजपा सरकार की लापरवाही का सीधा प्रमाण है।
भाजपा शासन में शिक्षक मर्यादा भूले बैठे हैं और सरकार आंख मूंदे बैठी है। pic.twitter.com/Zl66PF7I9x
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर कटनीचे जिल्हाधिकारी दिलीप कुमार यादव यांनी त्वरित कारवाई केली आणि जिल्हा शिक्षण अधिकारी ओ.पी. सिंग यांना चौकशीचे निर्देश दिले. शिक्षकाविरोधात जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, मुलांना दारू पिण्यास प्रोत्साहित करणे हे शिक्षक पदाच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्यासारखे आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकाविरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. हा व्हिडिओ पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला.