आजच्या काळात मोबाईलच्या अतिवापरामुळे लोकांना रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची आणि सकाळी उशिरापर्यंत झोपण्याची सवय लागली आहे. विशेषतः तरुण पिढीत ही सवय वाढताना दिसतेय. मुलांना लवकर उठवण्यासाठी पालक वेगवेगळे प्रयत्न करतात. पण, मुले ऐकण्याच्या मूडमध्येच नसतात. अशाच एका घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, जो पाहून प्रत्येक पालक आणि मुलांना तो आपलासा वाटेल.
या व्हिडीओमध्ये एका आईने आपल्या सकाळी उशिरापर्यंत झोपणाऱ्या मुलींना जागे करण्यासाठी जो हटके उपाय केला, तो पाहून संपूर्ण सोशल मीडिया हसून लोटपोट झाला आहे.
काय आहे 'हा' हटके उपाय?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, सकाळची वेळ आहे आणि दोन मुली त्यांच्या खोलीत गाढ झोपेत आहेत. आईने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असावा, पण मुलींवर काहीच परिणाम झाला नाही. अखेर आईने एक भन्नाट शक्कल लढवली. आईने थेट बँडवाल्यांना घरी बोलावले आणि त्यांना मुलींच्या बेडरूममध्ये जाऊन ढोल-ताशे वाजवण्यास सांगितले. क्षणाचाही विलंब न लावता बँडवाले मुलींच्या खोलीत पोहोचले आणि त्यांनी जोरदार बँड वाजवायला सुरुवात केली. बँडच्या कर्कश आवाजाने दोन्ही मुलींची झोपमोड झाली खरी, पण तरीही त्या काही वेळ बिछान्यावरच पडून राहिल्या. मात्र, थोड्या वेळाने एका मुलीने हसून बिछान्यातून उठण्याचे कष्ट घेतले. हा संपूर्ण प्रकार एखाद्या कॉमेडी शोपेक्षा कमी नव्हता.
लाखो लोकांनी पाहिला व्हिडीओ
हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 'gharkekalesh' नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. 'आईने सकाळी उशिरापर्यंत झोपलेल्या मुलांना उठवण्यासाठी बँड बोलावला' असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. केवळ ३४ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत ३ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर १३ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी खूप मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे, "मुलांना बिछान्यातून उठवण्याचा हा एक जबरदस्त मार्ग आहे! या 'वेक-अप कॉल'नंतर त्यांना पुन्हा उशिरापर्यंत झोपण्याची हिंमत होणार नाही." तर दुसऱ्या एका युजरने मजा घेत लिहिले, "एक बादली थंड पाणी ओतले असते तर एवढा खर्च वाचला असता!" अशा अनेक प्रतिक्रियांसह हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
Web Summary : Tired of her daughters sleeping late, a mother hired a band to blast them awake. The hilarious video went viral, with many parents relating to the struggle of waking up their kids.
Web Summary : अपनी बेटियों के देर तक सोने से परेशान होकर, एक माँ ने उन्हें जगाने के लिए बैंड किराए पर लिया। मजेदार वीडियो वायरल हो गया, कई माता-पिता बच्चों को जगाने के संघर्ष से जुड़ रहे हैं।