Monkey Dog Interview: दिल्ली-एनसीआरमधील कुत्र्यांना आश्रयगृहात पाठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, सर्वत्र भटक्या कुत्र्यांबद्दल चर्चा सुरू आहे. काही लोक म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने योग्य निर्णय दिला आहे. कारण भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर काहींना इजाही झाली आहे. दुसरीकडे काही लोक न्यायालयाच्या निर्णयावर विरोध दर्शवत आहेत. ते म्हणतात की कुत्रे हे मुके प्राणी आहेत, त्यांना बोलता येत नाही, म्हणून त्यांना असे एकटे पाडू नये. पण तुम्ही असा विचार करा की, जर कुत्रे बोलू शकले असते तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल काय म्हणाले असते... याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
कुत्रा बोलू लागतो तेव्हा...
व्हायरल झालेला हा व्हिडिओ एआय जनरेटेड आहे, ज्यामध्ये एक माकड इंडिया गेटसमोर एका कुत्र्याची मुलाखत घेताना दिसत आहे. मुलाखतीत, माकड कुत्र्याला विचारतो, 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर तुम्हाला काय म्हणायचे आहे?' यावर उत्तर देताना, कुत्रा म्हणतो, 'हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. आमच्याही भावना आहेत. आम्हाला अशाप्रकारे जबरदस्तीने दिल्लीतून बाहेर काढणे योग्य नाही'. यानंतर माकड दुसरा प्रश्न विचारतो, 'सर्वोच्च न्यायालय म्हणते की तुम्ही लोक माणसांना चावता?'. मग त्याला उत्तर म्हणून कुत्रा म्हणतो, 'दिल्लीत कुत्र्यांच्या चावण्यापेक्षा बलात्काराने जास्त लोक मरतात. तर तुम्ही माणसांनाही दिल्लीतून हाकलून लावाल का?' मग तिसऱ्या प्रश्नात माकड विचारतो, 'आता तुमचा काय प्लॅन आहे?'. याच्या उत्तरात कुत्रा म्हणतो, 'टिंकू भाई, आता संपूर्ण कुत्रा समुदाय संपावर जाईल. सर्वोच्च न्यायालयाला आपला निर्णय मागे घ्यावा लागेल.'
पाहा मजेशीर व्हिडीओ-
हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी हलक्या फुलक्या अंदाजात करण्यात आला आहे. माकड आणि कुत्र्याचा हा एआय जनरेटेड व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर @prerna_yadav29 नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'माकड दादाने दोगेश भाईंची मुलाखत घेतली. तुम्ही सर्वांनीही तो पहा'. हा व्हिडिओ १ लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि हजारो लोकांनी तो लाईकही केला आहे.