VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 18:53 IST2025-07-26T18:52:23+5:302025-07-26T18:53:26+5:30
monkey trekker viral video: हरिहर किल्ल्यावर चढताना ट्रेकरला हा अनुभव आला.

VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
monkey trekker viral video: सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. तरुणाईपासून ते मोठ्यापर्यंत पावसाळ्यात सारेच वीकेंडला बाहेर भटकंती करायला जातात. निसर्गाच्या सानिध्यात, एखाद्या धबधब्यावर किंवा ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यादरम्यान प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात. पण कधीकधी मजा-मस्ती करायला गेलेल्या एखाद्या माणसासोबत विचित्र गोष्टही घडते. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ज्यात तो माकडामुळेट्रेकिंग करणारा थोडासा घाबरताना दिसतो. त्यानंतर माकडही अजबच कृत्य करतो.
माकड हा प्राणी त्याच्या खोडसाळपणासाठी ओळखला जातो. संधी मिळताच तो लोकांना त्रास देतो. निसर्गरम्य ठिकाणी माकडं लोकांना त्रास देताना दिसतात. असाच काहीसा प्रकार एकेठिकाी घडला. एका माकडाने ट्रेकिंग करणाऱ्या व्यक्तीला आपले लक्ष्य बनवले. व्हिडिओमध्ये दिसते की, एक माणूस टेकडीवर चढत आहे आणि यादरम्यान त्याच्यासोबत बरेच लोक आहेत. यादरम्यान एक माकड त्याच्या जवळ येतो. तो माणूस माकडाला हटकतो. ते पाहून माकडाला राग येतो आणि तो त्याला त्रास देतो. त्यानंतर माकड त्या माणसाची बॅग उघडतो आणि सर्व कपडे खाली फेकून देऊ लागतो. बॅगेत काही खायला आहे का, या विचाराने माकड असे करतो असे बोलले जातेय. पण माकडाला काहीच मिळत नाही. पाहा व्हिडीओ-
त्यापुढे माकड तरूणाच्या पाठीवर चढतो आणि त्याला खूप त्रास देते. पुढे आणि खाली असलेले लोक त्या तरूणाला शांतपणे तिथेच दगड पकडून राहण्याचा सल्ला देतात. यादरम्यान माकड एकदा त्या तरूणाला चावण्याचाही प्रयत्न करतो. पण अखेर तो तरूण सुखरूप या प्रसंगातून वाचतो.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर mr_manish_kharte_05 नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. तो पाहिल्यानंतर लोक त्यावर कमेंट करत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले आहे की माकडाने त्या माणसाला त्रास दिला. दुसऱ्याने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की माकड इथे त्या माणसासोबत खेळत आहे. तर आणखी एकाने कमेंट केली की, विनाकारण कधीही कोणाला हटकू नये.