धक्कादायक! हायवेवर वेगाने धावणाऱ्या कारचा ड्रायव्हर डाराडूर झोपेत, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 13:14 IST2019-09-13T13:04:12+5:302019-09-13T13:14:06+5:30
अमेरिकेची ऑटोमोबाइल कंपनी टेस्ला जगभरात आपल्या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ओळखली जाते. टेस्ला त्यांच्य् ड्रायव्हर लेस इलेक्ट्रिक गाड्यांसाठीही फेमस आहे.

धक्कादायक! हायवेवर वेगाने धावणाऱ्या कारचा ड्रायव्हर डाराडूर झोपेत, व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेची ऑटोमोबाइल कंपनी टेस्ला जगभरात आपल्या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ओळखली जाते. टेस्ला त्यांच्य् ड्रायव्हर लेस इलेक्ट्रिक गाड्यांसाठीही फेमस आहे. कंपनी दावा करते की, त्यांच्या इलेक्ट्रिक कारमध्ये ऑटोपायलट फंक्शन आहे. पण यादरम्यान ड्रायवर्सना सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो.
सध्या सोशल मीडियात एका टेस्ला कारचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होता आहे. हायवेवर ५५ ते ६० किमी प्रति तासाच्या वेगाने चालत असलेल्या टेस्ला कारचा ड्रायव्हर आणि महिला प्रवासी दोघेही झोपलेले आहेत.
मेसाच्युसेटमध्ये राहणारे स्पोर्ट जर्नलिस्ट Dakota Randall ने हा व्हिडीओ तयार केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियातही शेअर केला होता.
Dakota Randall म्हणाले की, रविवारी सायंकाळी ३ वाजता मी एका कामासाठी बाहेर पडलो होतो. तेव्हा मी पाहिलं की, हायवेवर माझ्या कारच्या बाजूला असलेल्या टेस्लाचा ड्रायव्हर आणि प्रवासी दोघेही झोपलेले होते. मी दोघांना जागवण्याचा प्रयत्न केला, पण भीतीही होती की, त्यांच्या जागण्याने कारचा कंट्रोल जाऊ नये.
Statement from @Tesla :. pic.twitter.com/bw2qhl4YzY
— Dakota Randall (@DakRandall) September 10, 2019
टेस्लाच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे की, 'ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम' ड्रायव्हरला कोणत्याही स्थितीत सतर्क राहण्यास सांगते. जेव्हा ड्रायव्हर संकेताकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा ऑटोपायलट फंक्शन त्याला असं करण्यापासून ऱोखतो'.