दैव बलवत्तर! जेसीबी तरुणाला चिरडणार तितक्यात चमत्कार; थरकाप उडवणारा Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 15:46 IST2022-06-05T15:40:17+5:302022-06-05T15:46:06+5:30
Viral Video : "देव तारी त्याला कोण मारी" असं म्हणणारी एक आश्चर्यकारक घटना आता समोर आली आहे. र

दैव बलवत्तर! जेसीबी तरुणाला चिरडणार तितक्यात चमत्कार; थरकाप उडवणारा Video व्हायरल
नवी दिल्ली - दरवर्षी रस्ते अपघातात शेकडो लोक आपला जीव गमावतात. अनेक लोक नियमांचं पालन करतात. पण काही लोक असे असतात ज्यांना आपल्य़ा जीवाची काहीच पर्वा नसते. रस्त्यावर वेगाने गाडी चालवणं इतकाच त्यांचा छंद असतो. यामुळे रस्ते अपघात होतात. अलीकडच्या काळात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. काही वेळा अचानक चमत्कारही घडतात.
"देव तारी त्याला कोण मारी" असं म्हणणारी एक आश्चर्यकारक घटना आता समोर आली आहे. रस्ते अपघातांशी संबंधित विविध प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर अपघाताचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून तो पाहिल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल. एका बाईकस्वाराला जेसीबी चिरडणार इतक्यात चमत्कार होतो.
भरधाव वेगात एक जेसीबी अनियंत्रित होऊन तरुणाच्या दिशेने येत असतो. तितक्यात एक बोलेरो मध्ये येते आणि बोलेरो आणि जेसीबाची जोरदार धडक होते. यामुळे सुदैवाने तरुण एका भीषण अपघातातून वाचतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर satabhai_ranga_8060 या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला आतापर्यंत 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 50 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओ लाईक केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.