Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 19:55 IST2025-10-25T19:52:25+5:302025-10-25T19:55:08+5:30
Funny Video: हेल्मेटऐवजी जुन्या टीव्हीचा कव्हर डोक्यात घालून फिरणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल? याचा काही नेम नाही, अशाच एका व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, ज्यात एका तरुणाने हेल्मेटऐवजी जुन्या टीव्हीच्या कव्हरचा वापर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. पण या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
अगर आपके पास हेलमेट नहीं है, तो आप पुरानी खराब टीवी से भी काम चला सकते हैं। 😂 pic.twitter.com/GtsLZ6Luah
— Pranjal (@Pra7oel) October 25, 2025
हा व्हिडिओ @Pra7oel या एक्स हँडलवरून शेअर करण्यात आला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "तुमच्याकडे हेल्मेट नसेल तर, तुम्ही जुन्या तुटलेल्या टीव्हीचा कव्हरने काम भागवू शकतात." व्हिडिओत असे दिसत आहे की, एक तरुण बाईकवर बसला आहे आणि हेल्मेटऐवजी जुन्या टीव्हीचा कव्हर स्वत:च्या डोक्यात घालतो. हेल्मेटऐवजी जुन्या टीव्हीचा वापर करणाऱ्या तरुणाला पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.
या व्हिडिओला आतापर्यंत १५,००० हून अधिक व्ह्यूज आणि शेकडो लाईक्स मिळाले आहेत. वापरकर्त्यांनी मजेशीर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, “अपघात झाला तर जीव वाचवण्याऐवजी टीव्हीच डोक्यात अडकून बसेल!” दुसऱ्या व्यक्तीने मजेशीर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, "भारतीयांचा नाद करायचा नाही." तिसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, "हा जुगाड भारताबाहेर गेला नाही पाहिजे नाही तर, लोक खरोखरंच हेल्मेटऐवजी जुना टीव्ही डोक्यात घालून फिरतील." तर, तिसऱ्या व्यक्तीने " या तरुणाला भारतत्न द्या", अशी मजेशीर कमेंट केली आहे.