शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

'भावा,लवकर कर, आमच्याकडे वेळ नाही';जीव द्यायला निघालेल्या व्यक्तीला बघ्यांचा अजब सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 15:11 IST

सध्याच्या घडीला कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्याऐवजी मृत्यूला जवळ करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

Viral Video:सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज तसेच व्हिडिओज पाहायला मिळत असतात. दररोज सोशल मीडियावर वेगवेगळ्या स्वरूपाचा कंटेट शेअर केला जातो. पैकी अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. अगदी लहान मुलांसह तरुण पिढी ज्येष्ठ नागरिकही फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. काही वेळा भयानक स्वरुपाचे व्हिडिओ समोर येतात जे पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. नुकताच सोशल मीडियावर आत्महत्या करतानाच्या विचारात असलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या पायाखालची माती सरकेल.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती एका उंच इमारतीवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दिवसाढवळ्या आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या व्यक्तीला कुणीही परावृत्त करण्याचा प्रयत्न नसल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. याउलट खाली उभे राहून हे चित्र पाहणारे लोक त्याची थट्टा करताना या व्हिडिओत दिसत आहेत. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या सर्वांत शेवटच्या मजल्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहण्यासाठी खाली बघ्यांची गर्दी जमली आहे. यामध्ये अरे भावा, लवकर कर, आमच्याकडे वेळ नाही, अशी धक्कादायक प्रतिक्रिया काही जण देताना या व्हिडिओत दिसत आहेत. 

जीव देणाच्या विचारात असलेल्या व्यक्तीला पाहण्यासाठी बघ्यांची तोबा गर्दी

जीव देण्याचा विचार करत असलेल्या या व्यक्तीचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ १८ सेकंदाचा आहे. हा व्हिडिओ ४.०५ लाख फॉलोअर्स असणाऱ्या एक्स यूजरने शेअर केला आहे. १० मजल्याच्या इमारतीवर आत्महत्या करण्यासाठी गेलेली ही व्यक्ती अगदी टोकावर उभा असल्याचे दिसत आहे. या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांची तोबा गर्दी जमली.

दरम्यान, या व्यक्तीला समजावण्याऐवजी खाली जमलेले लोक त्या व्यक्तीच्या दिशेने खाणाखुणा करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये तिथे जमलेल्या जमावापैकी एक माणूस म्हणतो की, जे काही करायचे आहे ते लवकर कर, आमच्याकडे वेळ नाही. तर, निळ्या रंगाचे कपडे घालून उभा असलेला एक माणूस त्या व्यक्तीला खाली उडी मारण्याचा इशारा करताना व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ आफ्रिकामधील आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत तब्बल १६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

येथे पाहा व्हिडिओ:

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर