Viral Video: याला म्हणतात परफेक्शन! पोरगा खालून ट्रकमध्ये गॅस सिलिंडर फेकतोय, एकावर एक, एकावर एक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 18:15 IST2022-04-14T18:14:55+5:302022-04-14T18:15:50+5:30
या व्हिडीओला आतापर्यंत २६ लाख व्ह्यूव्ज मिळाले आहे, ओव्हर टाईमनावाच्या ट्विटर अकाऊंटने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Viral Video: याला म्हणतात परफेक्शन! पोरगा खालून ट्रकमध्ये गॅस सिलिंडर फेकतोय, एकावर एक, एकावर एक...
एखाद्या कामात एवढे परफेक्ट व्हावे की कोणी तुमच्या कामावार बोटही ठेवू नये. आपला आपल्यावरच ताबा नसतो तर दुसऱ्या वस्तूंवर काय ताबा ठेवणार. इंटरनेटवर बॉटल फेकल्यावर ती उभी राहिलेले अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण असा व्हिडीओ पाहिल्यावर काळजात धस् नाही झाले म्हणजे मिळवले.
एक तरुण मुलगा गॅसच्या ट्रकमध्ये गॅस सिलिंडर कसा ठेवतोय हे पाहिले तर धक्का बसेल. याला बॅलन्स तर म्हणतात. सिलिंडर ट्रकमध्ये भरता भरता तो एवढा ट्रेन झाला की तुम्हीच व्हिडीओ पहा ना...
हा व्हिडीओ फक्त १७ सेकंदांचा आहे. यामध्ये एक मुलगा सिलिंडर हाताने उचलत आहे आणि समोरच्या ट्रकच्या दिशेने भिरकावत आहे. तो सिलिंडर आपोआप तेथील सिलिंडवर एकावर एक असा जाऊन पडत आहे.
The Steph Curry of propane 🔥 pic.twitter.com/qyTZ7kaXdK
— Overtime (@overtime) April 12, 2022
या व्हिडीओला आतापर्यंत २६ लाख व्ह्यूव्ज मिळाले आहे, ओव्हर टाईमनावाच्या ट्विटर अकाऊंटने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.