शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: कडाक्याच्या थंडीत 'नागिन डान्स'... भारतीय जवानांच्या उत्साहापुढे बर्फही पडला फिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:07 IST

indian army naagin dance in viral video: ​​​​​​​लष्कराच्या जवानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

indian army naagin dance in viral video: भारतातील अनेक ठिकाणी हाडे गोठवणारी थंडी असते आणि श्वासोच्छवासही कठीण असतो. अशा अत्यंत दुर्गम भागात भारतीय सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांचा एक व्हिडिओ भारतीयांची मने जिंकत आहे. सोशल मीडियावर भारतीय लष्कराच्या जवानांचा एक अतिशय उत्साहवर्धक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जवान १८,००० फूट उंचीवर आणि - ५० अंश सेल्सिअस तापमानात 'नागिन डान्स' करताना दिसत आहेत.

जवानांचा जबरदस्त जोश

व्हिडिओमध्ये बर्फाच्छदित प्रदेशातील जमिनीवर भारतीय लष्कराचे जवान लष्करी पेहरावात (Winter Gear) अतिशय आनंदात 'नागिन डान्स' करताना दिसत आहेत. लग्नाच्या वरातीत जसा उत्साह असतो, तसाच काहीसा उत्साह या जवानांच्या डान्समध्ये पाहायला मिळत आहे. हा डान्स केवळ मनोरंजनासाठी नाही, तर वैद्यकीय कारणासाठी (Medical Science) केला जातो. सियाचीन किंवा गलवान सारख्या अत्यंत थंड भागात शरीर स्थिर राहिल्यास रक्त गोठण्याची (Blood clotting) किंवा 'फ्रॉस्टबाइट' होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत डान्स, उड्या मारणे किंवा हालचाल करणे हे शरीरासाठी 'नॅचरल हीटर'सारखे काम करते, ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ silentpatriot3 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, तो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून 'जय हिंद'च्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका युजरने लिहिले की, "आम्ही घरात पांघरूण बसून थंडीची तक्रार करतो, आणि इथे आमचे वाघासारखे शूर सैनिक आमचे रक्षण करत आहेत." दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे याची अधिकृत पुष्टी झालेली नाही, मात्र जवानांचा हा बाणा पाहून प्रत्येक भारतीय अभिमान व्यक्त करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian soldiers' 'Naagin Dance' in freezing cold goes viral.

Web Summary : A video of Indian soldiers performing 'Naagin Dance' at 18,000 feet in -50°C is winning hearts. This activity helps maintain blood circulation in extreme cold, acting as a natural heater and preventing frostbite. Netizens are praising the soldiers' spirit and dedication.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिक