Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:21 IST2025-06-06T14:19:24+5:302025-06-06T14:21:27+5:30

एका विवाहित महिलेने आपल्या पतीला त्याच्या कथित प्रेयसीसोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये रंगेहाथ पकडले. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

Viral Video: Husband was romancing his girlfriend, suddenly his wife entered! See what happened next | Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच

Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच

लग्नाचं नातं हे परस्पर विश्वास आणि निष्ठेवर आधारलेलं असतं, मात्र काही वेळा याच नात्याचा विश्वासघात करणारे प्रकार समोर येतात. मेरठमधील फूलबाग कॉलनीत अशाच एका घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे. या भागात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने आपल्या पतीला त्याच्या कथित प्रेयसीसोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीला गेल्या काही दिवसांपासून पतीच्या वागणुकीवर संशय येत होता. तपास घेतल्यानंतर, ती आपल्या कुटुंबियांसह थेट त्या महिलेच्या फ्लॅटवर पोहोचली, जिथे तिचा पती गर्लफ्रेंडसोबत राहत होता. तिथे दोघांना एकत्र पाहिल्यानंतर, संतप्त पत्नीने पती आणि त्याच्या मैत्रिणीला सगळ्यांसमोरच जाब विचारला आणि दोघांनाही चापटाबुक्क्यांचा प्रसाद दिला.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यात पती पत्नीला वारंवार शांत राहण्याची विनंती करताना दिसतो. तो तिला गोंधळ करू नये, असं समजावत देखील आहे. मात्र, पत्नी आणि तिचे नातेवाईक संतापलेले आहेत.

व्हिडीओमध्ये, पतीची प्रेयसी पांढरे कपडे घालून पतीच्या मागे लपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, तर पत्नी वारंवार पतीला मारण्याचा प्रयत्न करत आहे. तर पती तिचा हात मागे घेत आहे. दोन्ही महिलांमध्ये देखील हाणामारी होताना दिसत आहे.

दोन महिन्यांपासून सुरू होता संबंध
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पती दोन महिन्यांपासून आपल्या प्रेयसीसोबत फूलबाग कॉलनीतल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. याची माहिती मिळताच पत्नीने नातेवाईकांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास लावला आणि अखेर सर्व काही उघडकीस आले.

नेटकरी काय म्हणाले?
या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, "लोकांकडे दुसरे प्रेमसंबंध ठेवण्यासाठी इतका वेळ आहे का? इथे एकासाठीही वेळ काढणे कठीण झाले आहे." तर दुसऱ्याने म्हटले की, "प्रामाणिकपणा नावाची कोणतीही गोष्ट शिल्लक राहिलेली नाही."

Web Title: Viral Video: Husband was romancing his girlfriend, suddenly his wife entered! See what happened next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.