वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 19:44 IST2025-09-17T19:44:22+5:302025-09-17T19:44:51+5:30

Tiger Snoring Video: या व्हिडिओमध्ये एक पांढरा वाघ माणसासारखा जोरात घोरताना दिसतोय, ज्यामुळे नेटिझन्सही आश्चर्यचकित झाले आहेत.

viral video have you ever seen a tiger snoring netizens shocked passes hilarious comments | वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Tiger Snoring Video: सोशल मीडियावर वाघांची शिकार करताना किंवा गुरगुरतानाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण आता एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच थक्क केले आहे. या व्हिडिओमध्ये एक पांढरा वाघ माणसासारखा जोरात घोरतोय, ज्यामुळे नेटिझन्सही आश्चर्यचकित झाले आहेत.

वाघांची काळजी घेणारे आणि संशोधक वाघांचे घोरणे हे एक सकारात्मक लक्षण मानतात. हे लक्षण दर्शवते की हे वाघ त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये आरामदायी आणि सुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत असतो. हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी, ते आपल्याला आठवण करून देतात की हे वन्यप्राणी काही प्रमाणात आपल्यासारखेच असतात. पाहा व्हिडीओ-


वाघाचा घोरण्याचा व्हिडीओ @beyond_the_wildlife या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की वाघ गाढ झोपेत घोरतात. जेव्हा त्यांच्या नाक आणि घशातून हवा जाते तेव्हा ते कंपन करते आणि तेव्हा हे घडते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी बहुतेकदा वाघांना पूर्णपणे शांत आणि सुरक्षित वाटते तेव्हाच घडते.

लोकांनी दिल्या मजेदार प्रतिक्रिया

या गोंडस व्हिडिओला ५,००,००० हून अधिक वेळा पाहिले गेले आहे आणि ५४,००० हून अधिक लोकांनी लाईक केले आहे. इंटरनेट वापरकर्त्यांनी व्हिडिओवर मजेदार कमेंट्स देखील पोस्ट केल्या आहेत. एकाने लिहिले, "तो माझ्या वडिलांसारखाच घोरतोय." दुसऱ्याने कमेंट केली, "हा क्रूर शिकारी प्राणी घोरताना खूप गोंडस दिसतो."

Web Title: viral video have you ever seen a tiger snoring netizens shocked passes hilarious comments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.