Bride-Groom Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. यात भांडणं बघायला मिळतात, तर कधी काही मजेदार घटना असतात. नवरी-नवरदेवाचे डान्स आणि मंडपातील अनोख्या एन्ट्री तर नेहमीच बघायला मिळतात. सध्या नवरी-नवरदेवाचा असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात लग्नानंतरच्या अंगठी शोधण्याच्या रिवाजावेळी घडलेली मजेदार घटना दाखवण्यात आली आहे.
व्हायरल व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव त्यांच्या परिवारातील लोक एकत्र बसले आहेत. नवरीने मुठीत अंगठी धरून ठेवली आहे. तर नवरदेवाला ती मिळवण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. नवरदेव नवरीची मूठ उघडण्यासाठी भरपूर जोर लावताना दिसत, पण त्याचा काही फायदा होताना दिसत नाही. नवरी इथं वरचढ ठरताना दिसत आहे. नवरदेव पुन्हा प्रयत्न करतो, पण तरीही त्याच्या हाती काही लागत नाही. अशात कुटुंबातील सदस्य त्याच्यावर हसू लागतात.
एकंदर काय तर नवरीनं हे चॅलेंज जिंकलं आहे. लग्नातील रिवाजाचा हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यूजरनं यावर अनेक गमतीदार कमेंट्सही केल्या आहेत. bridal_lehenga_designn नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नवरदेवाची ही स्थिती पाहून लोकांनाही हसू आवरत नाहीये. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि शेकडो लाइक्स मिळाले आहेत.