शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:00 IST

Bride Father gets emotional viral video: हा व्हिडीओ पाहून लाखो नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत...

Bride Father gets emotional viral video: सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे, जे तुम्हाला कधी क्षणात रडवते, तर कधी खो-खो हसायला लावते. अवघ्या १५ ते २० सेकंदाच्या व्हिडीओपासून ते अगदी मोठमोठ्या शॉर्ट फिल्मपर्यंत सारेच नेटकऱ्यांना आवडते. अनेकदा सोशल मीडियावरील काही व्हायरल व्हिडीओ आपल्याला भावनिकही करतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे. लग्नानंतर वधूच्या निरोपाचा (Dulhan Ki Vidai) क्षण नेहमीच भावनिक असतो. सोशल मीडियावर अशाच एका व्हिडिओने लक्ष वेधले आहे, ज्यामुळे लाखो लोकांचे डोळे पाणावले आहेत.

व्हिडिओमध्ये, एक वडील आपल्या मुलीला निरोप देताना रडत वराला असे काही म्हणतात की तिथे उपस्थित असलेले सर्वांचे डोळे डबडबतात. या दृश्यातून दिसून येते की, सर्वांसमोर स्वतःला मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करत असतानाही आपल्या मुलीला निरोप देतात वडील किती भावनिक होतात. व्हायरल व्हिडिओमध्ये, आपल्या मुलीला पाठवणी करण्यापूर्वी, तो वधूपिता गहिरवलेल्या स्वरात वराला म्हणतो, 'जर कधी माझ्या मुलीचे काही चुकले, किंवा तुला वाटले की तुला माझ्या मुलीचा राग आला, तर तिला दुखवू नकोस किंवा तिला त्रास देऊ नकोस. तिला माझ्याकडे पाठव. मी तिला समजावेन. आजपासून मी माझ्या प्रिय मुलीला तुझ्या स्वाधीन करत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, वडिलांचे हे शब्द ऐकून वरही भावनिक होतो आणि त्यांना आश्वासन देतो की असे कधीही होणार नाही. मी तुमच्या मुलीचा नीट सांभाळ करेन आणि तिला आयुष्यभर साथ देईन. @_nannaku.prematho_ या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केलेला हा व्हिडिओ आहे. तो व्हायरल झाला असून, व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स भावुक झाले आहेत. वडिलांच्या निःस्वार्थ प्रेमाचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओमध्ये वडिलांसाठी मुलगी किती मौल्यवान असते हे दाखवले गेले आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यू मिळाले आहेत.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलmarriageलग्न