VIDEO: चुकून वाघांच्या कळपात गेला कुत्रा; वाघाच्या दृष्टीस पडताच भलताच प्रकार घडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 16:59 IST2021-10-13T16:59:12+5:302021-10-13T16:59:12+5:30
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल; वाघांचा पवित्रा पाहून साऱ्यांनाच धक्का

VIDEO: चुकून वाघांच्या कळपात गेला कुत्रा; वाघाच्या दृष्टीस पडताच भलताच प्रकार घडला
मोठ्या प्राण्यांनी छोट्या प्राण्यांची शिकार करायची. आपलं पोट भरायचं हा निसर्गाचा नियम आहे. वाघ, सिंह, बिबटे त्यांची शिकार सहजासहजी सोडत नाहीत. अनेकदा तर टप्प्यात नसलेली शिकारदेखील अतिशय हुशारीनं टिपण्याचं कौशल्य या प्राण्यांनी कमावलेलं असतं. त्यामुळे एखादा लहान प्राणी एकटाच तावडीत सापडल्यास त्याचा फडशा पडणं निश्चित मानलं जातं. त्यामुळेच वाघांच्या कळपातील एका कुत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाघांच्या कळपात गेलेल्या प्राण्याचा मृत्यू अटळ मानला जातो. मात्र कधी कधी वाघ लहान प्राण्यांना दया दाखवतात. त्यामुळे क्वचितच एखादा प्राणी वाघांच्या कळपातून सुखरुप परततो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक कुत्रा वाघांच्या कळपात गेल्याचं दिसत आहे. कुत्रा एका दगडाच्या बाजूला शांत बसून आहे. तितक्यात तिथे एक वाघ येतो. तो वाघाचा वास घेतो आणि डोक्यानं त्याला कुरवाळू लागतो.
वाघ थोडा वेळ कुत्र्याला पाहतो. त्याच्यावर हल्ला करत नाही. याचवेळी कुत्र्याशेजारी आणखी चार वाघ असतात. मात्र कोणीही कुत्र्याला इजा पोहोचवत नाही. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दीड लाख लोकांनी व्हिडीओ लाईक केला आहे.