शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Dog Viral Video: थांबायचं नाय गड्या..!! कुत्र्याने अवघ्या ४० सेकंदात दिला जीवनातील मोलाचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 21:06 IST

कुत्र्याचा हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल.

Dog Viral Video: जीवनात आवश्यक असलेली उत्कटता, धैर्य कधीकधी कमी पडते. त्याची पातळी कमी होते कारण आपण स्वतःच नकारात्मक विचार करतो. जेव्हा आपण जास्त विचार करतो तेव्हा अशा गोष्टी घडतात की ज्या केवळ कल्पनेतच शक्य असतात. त्यामुळे आपण काल्पनिक जगात धावत राहतो आणि काही वेळा शक्य असलेल्या गोष्टी अशक्य समजून देतो. पण जे लोक कायम प्रयत्न करत राहतात त्यांच्या बाबतीत मात्र कधीच असं कधीच होत नाही. प्रयत्न करणारे कायम पडतात, पण ते उठतात आणि प्रयत्न करत राहतात, त्यामुळेच ते एक दिवस नक्की यशस्वी होतात. असाच एक कुत्र्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, त्यामध्ये कुत्र्याने साऱ्यांनाच एक असा धडा दिला आहे, जो तुम्हाला ऊर्जा देऊ शकेल.

प्रयत्न करतच राहतो...

व्हिडीओ क्लिपमध्ये दिसते की, समोर उभ्या असलेल्या भिंतीकडे कुत्रा प्रथम पाहतो. मग तो लगेच पळून त्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करतो. हे काम पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटते की हे काम मांजर करू शकते, पण कुत्र्याला हे जमणार नाही. पण कुत्रा आपली मेहनत सुरूच ठेवतो. अनेक वेळा अयशस्वी होऊनही तो हार मानत नाही, उलट तो प्रयत्न करत राहतो... आणि असं म्हणतात की प्रयत्न करणाऱ्यांचा कधीच पराभव होत नाही.

अखेर तो भिंतीवर चढतो...

अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर, शेवटी त्याला त्याच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ मिळते. होय, शेवटी तो या सपाट भिंतीवर कशाचाही आधार नसताना चढतोच. तुम्हाला सांगतो, त्याचा व्हिडिओ आतापर्यंत 14 लाख वेळा पाहिला गेला आहे. अनेकवेळा अयशस्वी होऊनही त्याने हार मानलेली नाही आणि 40 सेकंदात सांगून टाकले की प्रयत्न करत राहा. कुत्र्याच्या समर्पणातून लोकांना प्रेरणा मिळत आहे की, जो प्रयत्न करत राहतो तोच अखेर जिंकतोच. त्यामुळे जर तुम्ही प्रयत्न केले नाहीत, तर तुम्ही जिंकलात की हरलात हे कसे कळणार, त्यामुळे प्रयत्न करताच राहा.

जीवनात हार मानण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा-

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलdogकुत्राSocial Mediaसोशल मीडिया