woman fall down from running train, Viral Video : हल्लीचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. त्यातही आजकालची तरुणी पिढी आणि कंटेट क्रिएटर रील साठी कुठल्याही थराला जातात. काही दिवसांपूर्वी एका तरुणीने मृतदेहाच्या बाजूला बसून लाइव्ह रील केल्याची घटना घडली होती. तर त्याआधी एका तरुणाने रीलसाठी एका मोठ्या धबधब्यात उडी घेतली होती. तशाच प्रकारचा एक प्रकार भारताच्या शेजारील देशात श्रीलंकेत घडला आहे. एका तरुणी रील बनवण्यासाठी ट्रेनच्या बाहेर लटकत होती. त्यावेळी तिला जबर धक्का बसला आणि ती ट्रेन मधून खाली पडली. तो व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ( Trending on Social Media )
नेमके काय घडले?
श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे ट्रेनमधून प्रवास करणारी चिनी तरुणी रविवारी झाडावर आदळली. ही मुलगी ट्रेनच्या दरवाज्यात उभी होती आणि तिच्या प्रवासाचे फोटो काढण्यासाठी दुसरा मित्र समोर उभा होता. त्यावेळी तरुणीला रीलचा मोह आवरला नाही. एखादा हटके व्हिडीओ शूट करण्याच्या उद्देशाने तिने जीव धोक्यात घातला आणि ट्रेनच्या बाहेर लटकली. ट्रेन भरधाव वेगात होती, त्यामुळे ती तरुणी पुढे एका झाडाच्या फांदीला धडकली आणि चालत्या ट्रेनमधून पडली. या भीषण घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे, जे पाहून लोकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ-
ट्रेनमधून पडूनही तरूणी बचावली...
चिनी तरुणी ट्रेनच्या दरवाजाची रेलिंग धरून बाहेरच्या बाजूला झुकली आणि तिचा व्हिडीओ समोरून रेकॉर्ड करण्यात आला. रीलसाठी धोकादायक पोज देण्याचा प्रयत्न करत ती खाली पडली. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, चिनी मुलगी आणि तिचा मित्र वेलवाटे आणि बंबालापिटिया या दरम्यान ट्रेनमध्ये चढले होते. आश्चर्याची बाब म्हणजे, ती तरूणी चालत्या ट्रेनमधून खाली पडली असूनही तिचा जीव बचावला. तिला किती गंभीर दुखापत झाली याबाबत माहिती मिळू शकली नाही. पण एका रिपोर्टनुसार, ती ट्रेनमधून खाली झाडाझुडुपांच्यात पडली. त्यामुळे तिला फार दुखापत झाली नाही. काही किरकोळ जखमा झाल्या.